Video : नवरदेवालाही पडलीय राष्ट्रवादीची भुरळ; त्याने घेतलेला उखाणा पाहाच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादीप्रेमी नवरदेवाचा उखाणा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसने फिनिक्स पक्षाप्रमाने झेप घेत राज्यात सत्तेत वाटा मिळवला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची साऱ्यांनाच भुरळ पडू लागली आहे.

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादीप्रेमी नवरदेवाचा उखाणा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसने फिनिक्स पक्षाप्रमाने झेप घेत राज्यात सत्तेत वाटा मिळवला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची साऱ्यांनाच भुरळ पडू लागली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील निलेश स्वामी या नवरदेवाने घेतलेला राष्ट्रवादीप्रेमी उखाणा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मरवडे येथील निलेश गुराप्पा स्वामी यांचा विवाह आज निवर्गी (ता.चडचण, जि. विजयपूर) येथे येळगी (ता. जत) येथील आरती हिच्याशी झाला.

प्रियकर आणि मुलांच्या मदतीने पत्नीनेच पतीचा केला खून

या विवाह सोहळ्यात नवरदेव निलेश याने 'नंदीचे नाव असतंय महादेवाच्या आदी, आरतीचे नाव घेतो मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी' मंडळी असा उखाणा घेतला. हा उखाणा आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने त्यास नेटिझन्सची पसंती मिळत आहे. नवरदेव निलेश स्वामी हे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newly Married man fall in love with NCP