पिंपरी : प्रियकर अन् मुलांच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून

The wife murdered her husband with the help of boyfriend and children in Pimpri
The wife murdered her husband with the help of boyfriend and children in Pimpri

पिंपरी : पतीला कृष्ठरोग असून स्वत:सह मुलांनाही कृष्ठरोग होईल असे वाटत असल्याने तसेच प्रेमात अडथळा ठरत असल्याने पत्नीनेच प्रियकर व मुलांच्या मदतीने पतीचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. अपघाताचा बनाव करून खून करणाऱ्या या आरोपींना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या बहिण सायमा यांचे पुण्यात निधन
 
दामोदर तुकाराम फाळके (वय 47, रा. गजानन सोसायटी, साईनगर, गहुंजे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी दामिनी दामोदर फाळके, तिचा प्रियकर राजेश सुरेश कुरूप (वय 45, रा. गजानन सोसायटी, साईनगर, गहुंजे व गंगा सेटेलाईट सोसायटी, वानवडी, रहजिा उद्यानाजवळ, वानवडी), मुलगा वेदांत दामोदर फाळके (वय 18) यांना अटक केली आहे. यासह दुसऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. 

Shocking ! पिंपरीत पाच वर्षीय चिमुकलीवर जेष्ठाकडून लैंगिक अत्याचार 

मृत दामोदर फाळके हे मारूंजीतील एका खासगी कंपनीत नोकरीला होते. त्यांची पत्नी दामिनीचे गहुंजे येथे छोटे हॉटेल आहे. तर राजेश ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. 23 नोव्हेंबरला रात्री दामोदर फाळके यांचा मामुर्डीत गाडीवरून पडून अपघात झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी त्यांचा मुलगा वेदांत याने पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यू झाल्याची खबर दिली. मात्र, याबाबत पोलिसांना संशय आला तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही फाळके यांचा मृत्यू अपघाती नसून घातपाताने झाल्याचे नमूद केले. त्यानंतर पोलिसांना सखोल तपास सुरू केला.

Video : 'तो' दोन्ही पायांनी अपंग; पण, पाहा कशी करतोय चोरी !

दरम्यान, दामोदर यांची पत्नी दामिनी, राजेश कुरुप यांचे अनैतीक संबंध असून दामोदर यांचा खून त्यांचे कुटुंबातील व्यक्तींनी केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी राजेश कुरूप व वेदांत फाळके यांना ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता कुरूप याने सांगितले की, त्याचे व दामिनी यांचे बारा वर्षांपासुन अनैतिक संबंध आहेत. दामोदर यांना कुष्ठरोग असल्याने, त्याच्या पत्नी व मुलांना कुष्ठरोग होईल असे दामिनी व दोन्ही मुलांना वाटत होते. तसेच दामोदर यांच्या औषधोपचारांसाठी फाळके कुटुंबीय कमावत असलेले पैसे कमी पडत होते. यासाठी त्यांनी अनेकांकडून बारा लाख रुपये कर्ज घेतले होते. ही रक्कम फेडण्यासाठी दामोदर यांच्याकडून कोणतीही मदत होत नसल्याने तसेच दामोदर यांचा रोग बरा होत नसल्याने सर्वांनी मिळून दामोदर यांना मोटारीने उडवून खून करुन अपघात झाल्याचा बनाव करण्याचा कट रचल्याचे सांगितले. 

पुणे : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; गुन्हा दाखल

त्यानुसार 22 नोव्हेंबरला दामिनी, वेदांत व विधीसंघर्षग्रस्त बालक हे त्यांच्या मारुंजी येथील विघ्नहर्ता हॉटेलमध्ये थांबले. रात्री अकराच्या सुमारस दामोदर कामावरुन हॉटेलवर आले. जेवण करुन हॉटेल बंद करुन दामिनी व विधीसंघर्षग्रस्त बालक एका गाडीवर, वेदांत एका गाडीवर तर दामोदर एका गाडीवर बसून घरी जाण्यास निघाले. त्यावेळी दामोदर हे कुणाल आयकॉनचे पुढे असलेल्या गोदरेज कंपनीच्या वळणाजवळ त्याच्या (एम.एच.14/डी.वाय/6135) या दुचाकीवरून आले असता राजेशने त्याच्या (एम.एच. 12/पि.एच./5531) या क्रमांकाच्या मोटारीने दामोदर यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. दामोदर रस्त्याचेकडेला पडले. यामध्ये त्यांना किरकोळ जखमा झाल्याचे दामिनीने प्रियकर राजेश याला फोन करुन सांगितले. त्यानंतर राजेश पुन्हा अपघातस्थळी आला. राजेशने त्याच्या मोटारीतील जॅक दामोदर यांच्या डोक्‍यामध्ये जोरात मारला. त्यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. दोघेही रस्त्याचेकडेला पडले. त्यावेळी जवळच असलेल्या वेदांतने रस्त्याच्या कडेला असलेला दगड दोन वेळा दामोदर यांच्या डोक्‍यामध्ये मारला. ते मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर सर्वजण आपआपल्या घरी गेले. त्यानंतर दामिनी, वेदांत व विधीसंघर्षग्रस्त बालक हे दामोदर यांचे कंपनीत गेले. दामोदर यांचा शोध घेत असल्याचा बनाव केला. तेथून वेदांत हा साईनगर येथील स्थानिक रहिवासी बाळासाहेब कानडे यांच्याकडे गेला. त्यांना घेवून दामोदर यांचा शोध घेत असल्याचा बनाव केला.

पुणे : शिपायाने मागितली 26 हजारांची लाच; अन् अडकला...​

दरम्यान, घटनास्थळी जावून दामोदर व त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याबाबतची माहिती फोनवरून दामिनी व इतरांना कळविली. तसेच तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात जावून अपघात झालेबाबत नोंद केली होती. मात्र, वैद्यकीय अहवाल व पोलिसांच्या सखोल तपासामुळे अपघाताचा बनाव असल्याचे समोर आले व खुनाचा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पाच वर्षांनंतर पुन्हा जळाला संसार; पुण्यातल्या महिलेची करुण कहाणी   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com