अंतिम वर्षाच्या परिक्षांवरुन नवे 'वादळ', पुन्हा राज्य विरुद्ध राज्यपाल ?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

निसर्ग वादळाचा मुंबईसह महाराष्ट्राला तडाखा बसणार असतानाच अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरुन नवे वादळ संपूर्ण राज्यात घोंघावण्यास सुरुवात झाली.

मुंबई : निसर्ग वादळाचा मुंबईसह महाराष्ट्राला तडाखा बसणार असतानाच अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरुन नवे वादळ संपूर्ण राज्यात घोंघावण्यास सुरुवात झाली. अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर 48 तासाच्या आत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी त्या निर्णयास स्थगित दिली आहे. 

भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलार यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना परिक्षा रद्द करण्याचा निर्णय चूकीचा असल्याचे सांगितले असल्याची चर्चा सुरु झाली. अखेरच्या सत्राची परिक्षा न घेता त्यापूर्वीच्या सत्राच्या परिक्षेतील गुणांची टक्केवारी काढून त्यानुसार गुण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याचवेळी ज्या विद्यार्थ्यांना आपले गुण वाढवायचे असतील त्यांना परिक्षा देण्याचीही मुभा दिली होती. मात्र त्यास भारतीय जनता पक्षाने विरोध केला होता. आता संध्याकाळी राज्यपाल कोश्यारी यांनी ट्वीट करुन परिक्षा रद्द करण्याचा निर्णय स्थगित केला असल्याचे कळवले. 

मोठी बातमी -  कोरोनावर मात करून 'ते' पुन्हा ऑन ड्युटी ; धारावी पोलिस ठाण्यातील १६ पोलिस सेवेत झाले रुजू..

बापरे! धारावीसह जी- उत्तर विभागात कोरोनाचा हाहाकार ;आतापर्यंत तब्बल 90 जणांचा मृत्यू...

मोठी बातमी  अरे वाह! आता कोविड केंद्रामध्ये 'या' अनोख्या तंत्रज्ञानाचा होणार वापर; डॉक्टर,नर्सेसच्या तुटवड्यावर निघाला तोडगा..  

राज्यपाल हे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलपती आहेत. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय आपल्याशी चर्चा करुन घ्यायला हवा होता, महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार हे आवश्यक आहे, असे ट्वीट त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी याबाबतचा निर्णय विद्यापीठ कायद्यानुसार होईल असे सांगितले.

news issues over conducting final year exams in maharashtra read full news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news issues over conducting final year exams in maharashtra read full news