esakal | राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार

राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार

sakal_logo
By
स्नेहल कदम

कोल्हापूर : जुलैच्या सुरुवातीला दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा (heavy rain in maharashtra) दमदार कमबॅक केले आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाची बॅटिंग सुरु झाली आहे. दरम्यान पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने (MID) या प्रदेशात हाय अलर्ट असणार असल्याचे सांगितले आहे. गेले काही दिवस पावसाची रिपरिप सुरु आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. मुंबई, पुणे, रायगड, कोकण, कोल्हापूर या भागांत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस होणार असल्यामुळे सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, कोकण किनारपट्टीतील (konkan rain) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, सांगली या प्रदेशात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांसाठी या भागात हाय अलर्ट (high alert) जारी झाला आहे. यापैकी काही जिल्ह्यात दोन दिवस रेड अलर्ट (rad alert) असणार आहे. यात पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मुंबईचा समावेश असणार आहे. या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने नदी काठच्या आणि डोंगरी भागातील प्रशासनाने गावांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाच्या सतंतधारेमुळे कोल्हापूरसह, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

loading image