नागपूरमधील दोघांचे पाकिस्तान कनेक्शन, NIA ची धाड; धक्कादायक माहिती उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NIA

नागपूरमधील दोघांचे पाकिस्तान कनेक्शन, NIA ची धाड; धक्कादायक माहिती उघड

नागपूरमध्ये एनआयएने धाड टाकल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पहाटे चार वाजल्यापासून चौकशी सुरू आहे. नागपूरमधील दोघांचे पाकिस्तान कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.(NIA raid nagpur investigation pakistan connection )

नागपूरच्या सतरंजीपुरा तसेच हंसापुरी भागात ही एनआयएकडून कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी पहाटे चार वाजताच ही धाड टाकण्यात आली आहे. मोबाईलवरुन पाकिस्तानामध्ये संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली होती. त्याच माहितीवरुन ही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात एनआयएनकडून दोघांची चौकशी सुरु आहे. सतरंजीपुरा येथील बडी मशीद जवळ राहणाऱ्या दोघांची पाकिस्तानातील व्यक्तीशी व्हाट्सएपच्या माध्यमातून चॅट केल्याच्या प्रकरणात पहाटे चार वाजता त्यांच्या घरी जाऊन एनआयएच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. अख्तर रजा वलद मोह आणि अहमद रजा वल्ड मोह असं या दोघांच नाव आहे.

सकाळी ८ वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती. सध्या केवळ नोटीस बजावून पथक परत गेले आहे. बडी मशीद येथे आयोजित इफ्तार पार्टीमध्ये काही दिवसांपूर्वी या दोघांनीही वाद घातला होता. त्यातून लकडगंज पोलिसांनी ही त्यांना चौकशीसाठी बोलाविले होते.