श्रीकृष्णाप्रमाणे कोणत्याही मुलाला तुरुंगात जन्माचे दुःख सहन करावे लागू नये; निदा खानला जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय म्हटले?

Court Grants Bail to Pregnant Ex-TCS Employee Nida Khan in Nashik Conversion Case : नाशिक धर्मांतर प्रकरणातील माजी TCS कर्मचारी निदा खानला गरोदरपणाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने जामीन मंजूर करत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली.
TCS case accused Nida Khan

TCS case accused Nida Khan

Esakal

Updated on

नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)च्या युनिटमधील कथित धर्मांतर प्रकरणात आरोपी असलेल्या माजी कर्मचारी निदा खान हिला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गरोदर असलेल्या महिलेला तुरुंगात ठेवून तेथेच बाळाला जन्म देण्याची वेळ येणे हे कोणत्याही स्त्रीसाठी अत्यंत वेदनादायी असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या परिस्थितीची तुलना भगवान श्रीकृष्णाच्या जन्मावेळी असलेल्या परिस्थितीशी करत न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com