Nilesh Rane : मीनाताई ठाकरेंच्या मृत्यूवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह; सुंदर व्यक्तीचा उल्लेख करत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Meenatai Thackeray Balasaheb Thackeray
Nilesh Rane : मीनाताई ठाकरेंच्या मृत्यूवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह; सुंदर व्यक्तीचा उल्लेख करत...

Nilesh Rane : मीनाताई ठाकरेंच्या मृत्यूवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह; सुंदर व्यक्तीचा उल्लेख करत...

राणे पितापुत्र सातत्याने ठाकरे परिवारावर टीका करत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे परिवाराविषयी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या ट्वीटमुळे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित होऊ लागले आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : अभिनेत्री कंगना रणौत CM शिंदेंना भेटणार; २०२४ च्या लोकसभेची तयारी?

काय आहे आहे ट्वीट?

आपल्या ट्वीटमध्ये निलेश राणे म्हणतात, "ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनावाच्या एका व्यक्तीचा मर्डर करण्यात आला का?? स्वर्गीय मीना साहेब (मासाहेब) ठाकरे ज्या दिवशी गेल्या त्या कशा गेल्या कुठल्या परिस्थितीत गेल्या, कर्जतच्या फार्म हाऊस वर काय झालं हे देखील महाराष्ट्राला एकदा कळलं पाहिजे.

हेही वाचा: Maharashtra Politics : CM शिंदे - प्रताप सरनाईकांमध्ये जोरदार भांडणं; भाजपा ठरलं कारण

निलेश राणेंच्या या ट्वीटमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. निलेश राणेंनी थेट बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी आणि उद्धव ठाकरेंच्या आई मीनाताई ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसंच आता या ट्वीटमधली सुंदर व्यक्ती कोण? अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.