esakal | "यापेक्षा जिमखान्याच्या अध्यक्षाला..."; 'BEST CM'ना टोला
sakal

बोलून बातमी शोधा

CM-Uddhav-Nilesh-Rane

"यापेक्षा जिमखान्याच्या अध्यक्षाला..."; 'BEST CM'ना टोला

sakal_logo
By
विराज भागवत

निलेश राणेंनी ट्वीट करून उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली

मुंबई: देशात सध्या अनेक राज्यांचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांबाबत नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. तर उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पदाचीच खांदेपालट झाली आहे. महाराष्ट्रातदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी चांगल्या कारणांमुळे तरी कधी लोकांच्या नाराजीमुळे चर्चेत असतात. या सर्व मुख्यमंत्र्यांचे नुकतेच रेटिंग जाहीर करण्यात आले. द प्रिंटने केलेल्या या सर्वेमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री कोण यावर उत्तर देताना जवळपास 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचं सांगितलं. पण भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी मात्र ठाकरेंची खिल्ली उडवली.(Nilesh Rane Comedy way trolled Best CM Uddhav Thackeray with Hilarious Tweet)

हेही वाचा: ठाकरे सरकारने थकवले 90 कोटी; 18 जण मागणार 'इच्छामरण'

या सर्वेसाठी बिहार, गोवा, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगना, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या 13 राज्यांची निवड करण्यात आली होती. 13 राज्यातील 17 हजार 500 जणांनी या सर्वेमध्ये सहभाग घेतला. त्यात उद्धव ठाकरेंना ४९ टक्के मतं मिळाली. ही सारी आकडेवारी निलेश राणेंनी ट्वीट करत त्यावरून त्यांना टोला लगावला. "१३ राज्यातील १७ हजार लोकांनी मतं दिली, भारताची लोकसंख्या १३० करोड आहे... महाराष्ट्राची जवळपास ११.५ करोड आणि राज्य २९ आहेत. यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील", अशा खोचक शब्दांत त्यांनी ठाकरेंची आणि या सर्वेची खिल्ली उडवली.

हेही वाचा: देशातील 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे 'लय भारी'

दरम्यान, सर्व्हेमध्ये 1. मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब आहे आणि त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये 2. कामगिरी चांगली असली तरी पुन्हा मत देणार नाही 3. मुख्यमंत्र्यांचे काम चांगले आहे आणि पुढच्यावेळी हेच मुख्यमंत्री हवेत. असे पर्याय देण्यात आले होते. लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना 49 टक्के लोकांची पसंती मिळाली. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना 44 टक्के मते मिळाली. यात तिसऱ्या स्थानी 40 टक्के पसंती उत्तरप्रदेशचे योगी आदित्यनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मिळाल्याचे दिसले.

loading image