गाळाच्या नावाखाली वाळू चोरीचा भास्कर जाधवांचा व्यवसाय; निलेश राणेंचा आरोप l Nilesh Rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nilesh rane, bhasker jadhav

शिवसेना आमदार भास्कर जाधव आज विधानसभेत स्वतःच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी गोंधळ घातला.

गाळाच्या नावाखाली वाळू चोरीचा जाधवांचा व्यवसाय; राणेंचा आरोप

शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सभागृहात गोंधळ घातला. यावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) भडकले. 'भास्कर जाधव यांना निलंबित करा'अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेला. या घटनेने राज्यभरातून प्रतिक्रिया येत असतानाच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane)यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. जाधवांचा व्यवसाय म्हणजे वाळू चोरी, वाळू सोडून गाळ उपसायला रॉयल्टी नको सांगून गाळ काढण्याचं कारण सांगतात आणी वाळू चोरली जाते,अशी टिका त्यांनी केली आहे.

विधानसभेत टीका करताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) नक्कल केल्यानं मोठा गदारोळ माजला. मोदींची नक्कल करताना त्यांनी केलेल्या अंगविक्षेपावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी 'भास्कर जाधव निलंबित करा' अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं.

देवेंद्र फडणवीस भास्कर जाधव यांच्या कृतीवरुन भडकले आणि असा प्रकार खपवून घेतला जणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान, भास्कर जाधव यांनी अंगविक्षेप मागे घ्यावा आणि माफी मागावी अशी मागणी लावून धरली. जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत कामकाज चालू दिलं जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतला. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी मोठा गदारोळ केला.

दरम्यान, राणे म्हणाले, शिवसेना आमदार भास्कर जाधव आज विधानसभेत स्वतःच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी गोंधळ घातला, जाधवांचा व्यवसाय म्हणजे वाळू चोरी, वाळू सोडून गाळ उपसायला रॉयल्टी नको सांगून गाळ काढण्याचं कारण सांगून वाळू चोरली जाते, सभागृहाला तुमचे धंदे माहित नाही पण आम्हाला तुमचा डाव कळला.असा आरोप राणेंनी केला आहे.