भास्कर जाधवांनी कुणबी समाजाची जाहीर माफी मागावी ; निलेश राणे : Konkan News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nilesh rane , bhaskar jadhav

शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून कोकणात सध्या राजकीय वातावरण तापल आहे.

भास्कर जाधवांनी कुणबी समाजाची जाहीर माफी मागावी ; निलेश राणे

मुंबईतल्या कुणबी भवनासाठीच्या पाच कोटींच्या सरकारी निधीच्या बदल्यात दापोलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेतल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी (Bhaskar Jadhav) केला. या आरोपामुळे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी कुणबी समाजाची जाहीर माफी मागावी असे ट्विट करत टिका केली आहे.

शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून कोकणात सध्या राजकीय वातावरण तापल आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न करणारे सुनील तटकरे सध्या शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते भास्कर जाधवांच्या रडारवर आलेत. शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी पक्ष प्रवेशानंतर कुणबी समाजावर वक्तव्य केले आहे.

राणे म्हणाले, शिवसेना आमदार भास्कर जाधवाने कुणबी समाजाची जाहीर माफी मागावी. सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन तटकरेंनी कुणबी समाज घटकांना प्रवेश दिला असं नीच वक्तव्य जाधवने केले. कुणबी समाज १ स्वतंत्र ताकत आहे, त्यांना कोणाच्या उपकाराची गरज नाही, भास्करची लायकी नाही कुणबी समाजावर बोलायची. असा घणाघात राणेंनी केली आहे.

मुंबईतल्या कुणबी भवनासाठीच्या पाच कोटींच्या सरकारी निधीच्या बदल्यात दापोलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेतल्याचा आरोप भास्कर जाधवांनी केला. पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना विधान परिषदेवर आमदारकीची जागा देण्याचं आश्वासन राष्ट्रवादीकडून देण्यात आलं. त्यावरून भास्कर जाधवांनी तटकरेंना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंवर हल्लाबोल केला. यावर नितेश राणे यांनी भास्कर जाधवांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.