'राहुल गांधी यांच्यासमोर शेवटचा पर्याय; भाजपात प्रवेश करावा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'राहुल गांधी यांच्यासमोर शेवटचा पर्याय; भाजपात प्रवेश करावा'

'राहुल गांधी यांच्यासमोर शेवटचा पर्याय; भाजपात प्रवेश करावा'

रत्नागिरी : काँग्रेस नेते (congress)आणि माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद (jatin prasad) यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि उत्तर प्रदेशातही (uttar pradesh) मंत्रीपद भूषवलेल्या जितीन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला धक्का बसला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यातच जतीन प्रसाद यांनी पक्षाला रामराम केल्याने काँग्रेसला धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसमधून आतापर्यंत अनेक नेत्यांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यावरून भाजपचे निलेशे राणे (nilesh rane) यांनी थेट राहुल गांधींवर निशाणा (rahul gandhi) साधला आहे.

ते म्हणाले, राहुल गांधींच्या जवळचे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे. मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हाच स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला आहे. राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे. अशी खोचक प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.

दरम्यान जितीन प्रसाद यांना राहुल गांधींचे विश्वासू मानले जात होते. मागील काही दिवसांपासून प्रियंका गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसाला ट्विट करत त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी जितीन प्रसाद यांना भाजपचे सदस्यत्व दिल आहे. यावेळी ते म्हणाले, मागील काही दिवसांपासून जितीन उत्तर प्रदेशमध्ये आपली सेवा देत आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांना महत्वाची भूमिका बजावली आहे.