esakal | 'जनतेला नियम पाळण्याचं आवाहन, स्वत: दसरा मेळावा घेणार'; राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

'जनतेला नियम पाळण्याचं आवाहन, स्वत: दसरा मेळावा घेणार'

अनेक राजकीय नेत्यांनीही आपल्या परिसरातील विविध मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली आहे.

'जनतेला नियम पाळण्याचं आवाहन, स्वत: दसरा मेळावा घेणार'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनानंतर आज घटस्थापनेच्या मुहुर्तावर भाविकांसाठी मंदिरे सुरु करण्यात आली आहेत. यानिमित्त अनेक राजकीय नेत्यांनीही आपल्या परिसरातील विविध मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली आहे. मात्र विरोधकांकडून टीका होत आहे. भाजपाचे निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर टीका केली आहे.

हेही वाचा: श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा शाळेत गोळीबार; दोन शिक्षकांचा मृत्यू

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब मुंबादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. जनतेने कोरोना नियमांचं पालन करावं अशी प्रार्थना केली. पण शिवसेना दसरा मेळावा घेणार आहे. पहिले मुख्यमंत्री असतील की, जे बोलतात ते त्यांचा पक्षच पाळत नाही. कोरोनाची भीती दाखवणं कमी करा आणि जनतेला जे गरजेचे आहे ते द्या, असा घणाघात त्यांनी केला आहे.

दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब मुंबादेवीचे दर्शन घेतले आहे. पत्ना रश्मी ठाकरे आणि मुले यांच्यासमवेत कोरोना नियमांचे पालन करत त्यांनी मंदिरात उपस्थिती दर्शवली. कोरोनानंतर आज महाराष्ट्रातील सर्व मंदिरात भाविकांनी देवींच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करत दर्शनाची सुविधा केली आहे.

loading image
go to top