Nilesh Rane I 'कटकारस्थान करून अपयश आलं की, सांगायचं संबंध जपणं महाराष्ट्राची संस्कृती' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nilesh rane v/s sharad pawar

सत्ताधारी गटातील नेत्यांसह विरोधकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

'कटकारस्थान करून अपयश आलं की, सांगायचं संबंध जपणं महाराष्ट्राची संस्कृती'

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सत्ताधारी गटातील नेत्यांसह विरोधकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, यावरून आता भाजपचे निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रपतींना शुभेच्छा देताना काय म्हणालेत शरद पवार?

भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुम्ही तुमच्या आदरणीय कार्यालयाची जबाबदारी आणि कार्यभार स्वीकारण्याची तयारी करत असताना तुम्हाला माझ्या शुभेच्छा. तुमच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तुम्हाला यशाच्या शुभेच्छा, असं म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यांनी यात वापरलेल्या Heartfelt congratulations या शब्दांवरून राणेंनी पवारांना धारेवर धरलं आहे.

हेही वाचा: केजरीवाल म्हणतात, "तुरुंगाला घाबरत नाही"; राज्यपालांनी केली होती CBI चौकशीची शिफारस

यासंदर्भात निलेश राणे ट्वीट करत म्हणतात, नवीन राष्ट्रपतींना शुभेच्छा देण्यासाठी पवार साहेबांचे ट्विट बघितले. सुरुवात Heartfelt congratulations या शब्दांनी केले. सगळे कटकारस्थान करून अपयश आलं त्यानंतर सांगायचं संबंध जपणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असं म्हणत त्यांनी टोमणा मारला आहे.

दरम्यान, राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना 540 मतं मिळाली होती. या मताचे मूल्य 3,78,000 इतकं होतं. सर्व राज्यांतील मतमोजणी झाल्यानंतर अखेर मुर्मू यांना 5 लाख 77 हजार 777 इतकी मतं मिळाली. विशेष म्हणजे 15 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 21 जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 21 जुलै 2007 रोजी झालेल्या मतमोजणीत प्रतिभा पाटील यांचा विजय झाला होता.

Web Title: Nilesh Rane Criticized To Sharad Pawar On Draupadi Murmu Congratulations To President

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top