
शरद पवारांना नवे सरकार स्थापन झाल्याचे पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला का?
'पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग आला की, पवार साहेब म्हणाले...'
काल झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत मध्यावधी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी तयार राहण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत. डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होईल, असे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. दरम्यान, आता पवारांवर भाजपकडून टीकेची झोड उठवली जात आहे. भाजपाचे निलेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. (nilesh rane on sharad pawar of news maharashtra govt)
निलेश राणे ट्वीटमध्ये म्हणतात की, शरद पवारांना नवे सरकार स्थापन झाल्याचे पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात ते म्हणाले, हे सरकार सहा महिने टिकेल. पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग?, असा म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (maharashtra politics)
हेही वाचा: बंडखोर नेते खरंच शिवसेनेचे आमदार राहिलेत का?, स्वत:ला विचारा - राऊत
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारची आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
बैठकीत काय म्हणाले शरद पवार?
गुजरात आणि महाराष्ट्रात एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता पवारांनी व्यक्त केली आहे. हे शिंदे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल का? हाही प्रश्न असल्याचेही पवार या बैठकी दरम्यान म्हणाले. त्यामुळे आमदारांनी मतदारसंघात जावे, काम करत राहावे. निवडणूक लागल्या तरी तयारी असावी, यासाठी आमदारांनी मतदारसंघात लक्ष द्यावे, असे आदेश पवार यांनी आमदारांना दिलेत.
हेही वाचा: Maharashtra Floor Test: सेनेनंतर NCP मध्येही फूट? पाच आमदार राहिले होते गैरहजर
Web Title: Nilesh Rane Criticizes To Sharad Pawar On New Maharashtra Govt Disclosed After 6 Months
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..