Nilwande Dam: निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्याचे उद्घाटन PM मोदींच्या हस्ते पुन्हा होणार

नुसत्या पत्राने धरण कसे होणार
pm modi
pm modiesakal

कोल्हार: ‘‘नुसते पत्र देऊन साधे चर किंवा नाल्याही उकारल्या जात नाहीत, तर धरण कसे होणार? त्यांच्या बातम्यांकडे केवळ मनोरंजन म्हणूनच पहा. पत्राने धरण होत असतील, तर आमचे किती तरी तळे, चर उकरणे अजून बाकी आहे. त्यासाठी पत्र दया आणि काम होते का ते पहा,’’ असा उपरोधक टोला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला.

कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या नूतन पदाधिकाऱ्यांची काल निवड झाली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी डॉ. विखे येथे आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की धरणाचे जे स्वप्न नगर जिल्ह्याच्या अकोले, संगमनेर, राहाता व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाहिले, ते पूर्णत्वास आले आहे. त्यासाठी अनेक लोकांचे सहकार्य लाभले. गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष आणि अनेक लोकप्रतिनिधींचा सहभाग धरणाच्या व कालव्याच्या कामात प्रदीर्घ राहिला आहे. या विषयात प्रत्येकाचे योगदान आहे.

pm modi
Lok Sabha Election 2024: लोकसभेची जबाबदारी स्वीकारतो म्हणत, शिवसेनेच्या खासदाराची भाजपने उचचली जबाबदारी

पण प्रामुख्याने मी असे समजतो, की माझ्या राजकीय कारकीर्दीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जी बैठक झाली.

तीमध्ये कालव्याच्या पहिल्या पाच किलोमीटरच्या प्रश्न होता. त्याचा तोडगा या बैठकीत निघाला. मग खरे काम सुरू झाले. आज तेच पाणी आता येत आहे. पाच किलोमीटरचे काम झाले नसते, तर पाणी कधीही आले नसते. यात आमच्यासह अनेकांचा प्रदीर्घ संघर्ष आहे.

pm modi
Lok Sabha Election 2024: लोकसभेची जबाबदारी स्वीकारतो म्हणत, शिवसेनेच्या खासदाराची भाजपने उचचली जबाबदारी

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार

जिरायती परिसरात पाणी आल्यामुळे या भागातील शेतकरी आता पाण्यापासून वंचित राहणार नाहीत. सध्या फक्त कालव्यांची चाचणी होत आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे अधिकृत उद्घाटन होणार आहे.

आता फक्त डाव्या कालव्यांची चाचणी होईल. उजवा कालवा दोन महिन्यांनी पूर्ण होणार आहे. दोन्ही कालव्यांची कामे पूर्ण होतील. त्यानंतर पूर्ण प्रकल्पाचे एकत्रित उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com