कुंभारीच्या अश्विनी मेडिकल कॉलेजमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीतील नऊजण जेरबंद! विजापूर नाका पोलिसांची कामगिरी; कारमध्ये आढळले ‘एवढे’ साहित्य; ‘या’ पथकाची कामगिरी

कुंभारीच्या अश्विनी मेडिकल कॉलेजमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या नऊ संशयित आरोपींना बुधवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास गस्त घालणाऱ्या विजापूर नाका पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.
solapur
Solapur Crime.sakal
Updated on

सोलापूर : कुंभारीच्या अश्विनी मेडिकल कॉलेजमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या नऊ संशयित आरोपींना बुधवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास गस्त घालणाऱ्या विजापूर नाका पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.

कुमठे रोडवरील टिकेकरवाडी रेल्वे ब्रिजच्या बोगद्याखाली एका वाहनात नऊ जण थांबले होते. त्याठिकाणी थांबून ते बुधवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास दरोड्याचा प्लॅन आखत होते. त्याचवेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांना त्यांच्याबद्दल संशय आला आणि त्यांची विचारपूस केल्यावर ते सर्वजण दरोड्याच्या उद्देशाने आल्याची खात्री होताच पोलिसांनी त्यांना पकडले. अटक केलेल्यांमध्ये कनकुर्ती ज्ञानदेव गोंधळी (रा. गांधीनगर स्टार चौक, विजयपूर), संजय मल्लप्पा पुजारी, समीर मुक्तुमसाब कोलार, अभिषेक देवानंद बिरादर, लिंगय्या हिरय्या हिरेमठ, प्रविण मोनाप्पा बडीगेर (सर्वजण रा. चिक्करगी, विजयपूर), आकाश बसवराज भासगी (रा. सुरगीहळ्ळी, सिंदगी), रमेश महादेवप्पा सालोडगी (रा. दवरहिप्परगी, विजयपूर) व हबीब पठाण (कुंभारी) यांचा समावेश आहे. दरम्यान, एक संशयित फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. अटक केलेले सर्व संशयित आरोपी १९ ते २३ वयोगटातील आहेत. त्यांना उद्या (गुरूवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अशी होती दरोड्याची तयारी

नऊ जणांनी दरोडा टाकण्याचा प्लॅन तयार केला व जाताना सोबत त्यांनी वाहनात (केए ६४, ४०३३) एक लोखंडी कटर, गॅस टाकी, ऑक्सिजन गॅस टाकी, रबरी पाईपसह प्रेशर रेग्युलेटर गॅस कटर, लोखंडी कटावणी, लोखंडी पाना, ॲडजेस्टेबल पाना, नवीन चार काळ्या रंगाचे टी-शर्ट, एक जुना काळा टी-शर्ट, चार तोंडाचे काळे मास्क, नऊ जोड पांढरे हॅण्डग्लोज, काळ्या रंगाचा स्कार्प, निळ्या रंगाची सॅक व त्यात दोन धान्याची रिकामी पोती घेतली होती. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

प्रवेश प्रक्रियेमुळे जमा झालेल्या शुल्कावर डोळा

सध्या मेडिकल कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी भरलेली कोट्यवधी फी त्याठिकाणी असेल, असा त्यांचा अंदाज होता. त्यानुसार त्या शुल्काची रक्कम दरोडा टाकून पळवायचा त्यांचा प्लॅन होता, अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार गायकवाड तपास करीत आहेत.

‘या’ पथकाने केली कामगिरी

पोलिस आयुक्त एम. राज कुमार, सहायक पोलिस आयुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त यशवंत गवारी, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादा गायकवाड, पोलिस निरीक्षक संगिता पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख शितलकुमार गायकवाड, पोलिस हवालदार सचिन हार, शंकर भिसे, गणेश शिर्के, हुसेन शेख, संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, अमृत सुरवसे, समाधान मारकड, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्निल जाधव, रमेश कोर्सेगाव, सिद्धेश्वर स्वामी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.