Nitesh Rane I 'राज ठाकरेंवर बोलण्यापेक्षा राऊतांनी एकटं मुंबई-महाराष्ट्र फिरून दाखवावं' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

'राऊत हे नक्की शिवसेनेच्या की राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदार झाले आहेत?'

'राज ठाकरेंवर बोलण्यापेक्षा राऊतांनी एकटं मुंबई-महाराष्ट्र फिरून दाखवावं'

सध्या राज्यातील राजकीय वातावरणाचा आलेख दिवसेंदिवस आरोपप्रत्यारोपांनी चढत असल्याचे चित्र आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सध्या राजकीय वातावरणाला रंग चढत असून भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष पहायला मिळते आहे. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 'राऊत यांच्यासारख्या लोकांना महत्व द्यायचं नाही, असं आम्ही ठरवलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा संजय राऊत यांनी एकटे अयोध्या सोडा, मुंबई-महाराष्ट्र तरी फिरले तरी काय अवस्था होईल हे कळेल, असा टोला आमदार राणे यांनी लगावला आहे.

संजय राऊत हे संपूर्ण दिवस राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आणि अन्य लोकांची लोमतेगिरी करून परत एकदा खासदार झाले आहेत. त्यामुळे राऊत हे नक्की शिवसेनेच्या की राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदार झाले आहेत?' असा खोचक सवालही नितेश राणे यांनी केला आहे. दिवा विभागात भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी नितेश राणे यांनी राज्य सरकारचा जोरदार समाचार घेतला.

हेही वाचा: '...हे तर होणारच होतं, भूमिका बदलली नाही ते शरद पवार कसले?'

यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. मात्र राज्यातील सत्ताधाऱ्यांना एक टक्का लाज उरली आहे वाटतं, त्यामुळे त्यांनी काहीतरी दिखावा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही राज्य सरकारकडे इंधनावरील कर कमी करण्याची मागणी करत होतो. मात्र नंतर आम्हाला समजलं आर्थिक बजेटचा उद्धव ठाकरे यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त बॅगा आणणे आणि बॅगा पोहोचवणे एवढंच येतं,' असंही ते म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर' या सिनेमावरूनही नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, आनंज दिघे यांचे नुसते नाव वापरायचे असेल आणि त्यांच्याविरुद्ध काम करायचं असेल तर मग चित्रपटाचा प्रमोशन का करताय? जे चित्रपटामध्ये दाखवलं आहे तसंच वस्तूस्थितीमध्ये ठाण्यात कानाकोपऱ्यात काम सुरू आहे का? असा सवाल राणे यांनी केला आहे.

हेही वाचा: 'व्हत्याच नव्हतं अन् नव्हत्याच व्हतं, पवारांच्या नादला लागू नका'

Web Title: Nitesh Rane Challenge To Sanjay Raut Remove Ayodhya Mumbai And Maharashtra Tour Independent

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top