सलमान खुर्शीद यांना ISIS संघटनेच्या ताब्यात द्या ; नितेश राणे : Nitesh Rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitesh rane criticise on dipak kesarkar

खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटना ISIS आणि बोको हरामसोबत केली आहे.

सलमान खुर्शीद यांना ISIS संघटनेच्या ताब्यात द्या ; नितेश राणे

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या पुस्तकांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटना ISIS आणि बोको हरामसोबत केली आहे. यावरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधून टिकेचे सुर उमटू लागले आहेत. खुर्शीदच्या पुस्तकाची पाने फाडण्यापेक्षा एक दिवस त्यालाच टराटरा फाडण्याचा कार्यक्रम घ्यावा लागेल. असे वक्तव्य भाजपा आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) ट्विट केले आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचे पुस्तक 'Sunrise Over Ayodhya: Nationhood in Our Times' नुकतंच प्रकाशित झालं असून ते वादग्रस्त ठरलं आहे. या पुस्तकातील एक प्रकरण 'द सॅफ्रॉन स्काय' मध्ये मांडण्यात आलेल्या एका विधानावरुन हा वाद सुरु झाला आहे. काल भाजपाचे नेते राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये खुर्शीदवर एफआयआर दाखल करण्याचा दावा केला होता. आज नितेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे.

राणे म्हणाले,सलमान खुर्शीद आणि अख्तर सारख्या नालायकांना एक दिवस तरी ISIS सारख्या संघटनेच्या हवाली केले पाहिजे. हिंदुत्व आणि त्यांच्यामध्ये काय खरा फरक आहे, याबद्दल ते तोंड उघडणार नाहीत.खुर्शीदच्या पुस्तकाची पाने फाडण्यापेक्षा एक दिवस त्यालाच टराटरा फाडण्याचा कार्यक्रम घ्यावा लागेल. असेही ते म्हणाले.

loading image
go to top