
नवाबभाई कहते है ‘रियाझ भाटी दाऊद का आदमी है’अरे ये कहना क्या चाहते हैं ? असं ट्टिट नितेश राणे यांनी केलं आहे. यावर नवाब मलिक यांना नेमके काय म्हणायचे आहे अशा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी काल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्ड आणि ड्रग्ज माफियांशी असलेले संबंध उघड करणार असल्याचे सांगितले होते. आज पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
यावेळी नवाब मलिक म्हणाले, रियाझ भाटी कोण आहे? दाऊद इब्राहिमच्या टोळीशी त्याचे संबंध आहेत. हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्याच्यावर वर्तमानपत्रात बातम्या आल्या. दुहेरी पासपोर्टसह त्याला मुंबईच्या सहारा विमानतळावर पकडले जाते आणि दोन दिवसांत त्याची सुटका होते. तो तुमच्या शोमध्ये का दिसला? देशाच्या पंतप्रधानांवर आरोप करायचे नाहीत, पण पीएम मोदी या शहरात आले आणि रियाझ भाटी त्या कार्यक्रमाला पोहोचला, असा मुद्दा नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री बिझनेस पार्टनर बरोबर मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळामध्ये बसलेले आहेत.
यावर नितेश राणे यांनी आज ट्विट करत मुख्यमंत्र्याच्यावर टीका केली. ते म्हणाले, 93 च्या दंगलीनंतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईच्या हिंदू लोकांना वाचवलं. त्यामुळे एक नवा इतिहास रचला गेला. आज इतक्या वर्षानंतर त्यांचाच मुलगा 93 च्या दंगली मधील जे मुख्य आरोपी आहेत. त्यांच्याच बिझनेस पार्टनर बरोबर मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळामध्ये बसलेले आहेत. यामुळे तर खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे. हा समस्त हिंदूंचा अपमान आहे. शिवसैनिक आता स्थळावर जाऊन गोमूत्र शिंपडणार का? ते जर शिंपडणार नसतील तर येत्या काही दिवसात मी स्वतः जाऊन गोमूत्र शिंपडणार आहे असेही त्यानी म्हंटले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जुने फोटो नितेश राणे यांनी ट्विट केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.