'ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही, खानच्या पोराची चिंता' - नितेश राणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Politics

ठाकरे सरकारला आर्यन खानची चिंता आहे. पण पाटलाच्या मुलाची, देशमुखाच्या मुलीची नाही.

'ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही, खानच्या पोराची चिंता'

मुंबई - सारथी, अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ या संस्थांचा कणा मोडणारे ठाकरे सरकारने केलं आहे. मराठा तरुणांचे वय वाढत असताना मराठा आरक्षणावर कोणत्याही प्रकारचा तोडगा या दोन वर्षात काढलेला नाही, यावर राज्यसरकारने उत्तर दिलंच पाहिजे, अशी प्रतिक्रीया भाजपाचे नितेश राणे यांनी दिली. ते आज मुंबईत बोलत होते. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्यसरकावर टीका केली.

हेही वाचा: भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला!

मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या दोन मुद्द्यांवरून त्यांनी राज्यसरकारला धारेवर धरलं. ते म्हणाले, ठाकरे सरकारला आर्यन खानची चिंता आहे. पण पाटलाच्या मुलाची, देशमुखाच्या मुलीची चिंता नाही. सारथी, अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ या संस्थांचा कणा मोडणारे ठाकरे सरकार मराठा तरुणांचे वय वाढत असताना नोकरीची शास्वती देऊ शकत नाही. अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन वर्षांत एक तरी बैठक घेतली असेल तर त्याचा फोटो दाखवावा. यासाठी मराठा क्रांती मोर्चाचा काळ परत आणावा लागेल, या सरकारला झुकवल नाही तर, हे गेंड्याच्या कातडीचे लोक असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा: भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला!

दरम्यान, गेली दोन वर्ष राज्यसरकारने मराठा आरक्षणाच्याबाबतीत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. या काळात समाजाने ५८ मोर्चे काढले आहेत, त्यावर कोणतेही भाष्य नेत्यांनी केलेलं नाही. मराठा तरुणांचे वय वाढत असताना नोकरीची शास्वती हे सरकर देऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महारांजांच्या स्मारकाबद्दल मुख्यमंत्र्यांनी किती बैठका घेतल्या ? असा सवालही त्यांनी यावेळी केला. जर असे असेल तर मराठा क्रांती मोर्चाचा काळ परत आणावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

loading image
go to top