
'बाबरी मस्जिद पाडताना राज ठाकरे कुठे होते माहीत नाही'
'बाबरी मस्जिद पाडताना राज ठाकरेंच माहीत नाही, उद्धव ठाकरे मात्र कॅमेरा साफ करत होते'
सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी अगदी वेगाने घडत आहेत. त्याचा काहीसा परिणाम हा राजकीय वर्तुळावर होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात काही मुद्द्यांवरुन चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा भाजपा आमदार नितेश राणे यांचे एक ट्विट समोर आले आहे. बाबरी मशीद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते, असा सवाल काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. आता त्यांच्या या वक्तव्याला आमदार नितेश राणे यांनी प्रतित्त्युर दिलं आहे.
हेही वाचा: राज ठाकरे पुण्यात... पण वसंत मोरे दौऱ्यातून गायब
आमदार राणे ट्विटमध्ये म्हणतात, बाबरी मस्जिद पाडताना राज ठाकरे कुठे होते माहीत नाही. उद्धव ठाकरे नक्कीच त्यांचा कॅमेरा साफ करत मातोश्रीत बसले होते, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. दरम्यान, आता त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा: महागाईचा तडाखा; CNG चार रुपयांनी वाढला
दरम्यान, सध्या राज ठाकरे आणि मनसे हे राज्याच्या राजकारणता सक्रिय झाले आहेत. उद्या म्हणजे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या औरंगाबादला जाण्यासाठी ते कार्यकर्त्यांच्या शेकडो ताफ्यासह थोड्या वेळात पुण्यातून निघणार आहेत. औरंगाबाद ला रवाना होण्याआधी पुण्यात त्यांच्या राजमहाल या निवासस्थानी शंभर पुरोहित येणार आहेत. यातच आता भाजपाने राज ठाकरेंच्या हालचाली पाहून शिवसेनेला चिमटा काढला आहे.
Web Title: Nitesh Rane Criticizes To Uddhav Thackeray On Babri Masjid Dispute Raj Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..