Nitesh Rane : हिंदुच्या नादाला लागाल तर डोळे काढू; नितेश राणेंचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitesh Rane

Nitesh Rane : हिंदुच्या नादाला लागाल तर डोळे काढू; नितेश राणेंचा इशारा

शिर्डी : भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि आदिवासी तरूणींचे अपहरण अशा मुद्द्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला असून यामध्ये माजी आदिवासी विकास मंत्री अशोक विखे सुद्धा उपस्थित आहेत. श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला असून हिंदुंवर आत्याचार करणाऱ्याचे डोळे काढू असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला आहे.

(Nitesh Rane protest Latest Updates)

दरम्यान, अमरावती येथे लव्ह जिहाद झाल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून श्रीरामपूर येथे एका तरूणाने मुस्लीम युवतीशी लग्न केल्यामुळे त्याचे अपहरण करून त्याच्यासोबत घातपात केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ नितेश राणे यांनी हिंदुत्ववादी संघटना आणि काही आदिवासी संघटनांना घेऊन मोर्चा काढला आहे.

हेही वाचा: गुजरातेत ATSची मोठी कारवाई; 200 किलो ड्रग्ज जप्त

नितेश राणे यांनी यावेळी हिंदूंना टार्गेट करणाऱ्यांना इशारा दिला असून, "आता महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामुळे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. आता मुश्रीफ, मलिक मंत्री नाहीत आणि उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री नाहीत, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वांत जास्त हिंदुवर आत्याचार झाले. ठाकरे सरकार हे हिंदुविरोधी सरकार होते पण आता भाजपचं सरकार आहे त्यामुळे आता असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. हिंदू मुलांच्या नादाला लागाल तर डोळे काढू." असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा: Vande Bharat Train: 'वंदे भारत'ने तोडला बुलेट ट्रेनचा रेकॉर्ड; अवघ्या 52 सेकंदात 100 किमी स्पीड

राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना, "ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा याकूब मेमनच्या कबरीचे बांधकाम झाले पण शिवसेनेने बाळासाहेबांचे स्मारक बांधले नाही, तुम्हाला बाळासाहेबांपेक्षा याकूब मेमन मोठा वाटतोय का? त्यांच्या सरकारच्या काळात हिंदुवर जास्त हल्ले झाले म्हणून खरा उद्धव ठाकरे काय आहे हे आता जनतेसमोर आलं आहे." असा वक्तव् राणेंनी केलं आहे.

Web Title: Nitesh Rane Shirdi Protest Love Jihad Hindu Muslim

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..