''पेंग्विनची स्कॉटलंड वारी, शेतकरी उपाशीपोटी काम करी'' | Nitesh Rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitesh rane

''पेंग्विनची स्कॉटलंड वारी, शेतकरी उपाशीपोटी काम करी''

मुंबई : ''बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा आहे, मात्र इथे सामान्य जनता महाविकास आघाडी सरकारने दिलेली सजा भोगत आहे, पेंग्विनची स्कॉटलंड वारी, शेतकरी उपाशीपोटी काम करी अशी टीका भाजप नेते नितेश राणे (bjp nitesh rane) यांनी केली आहे. यावेळी राणे यांनी आपल्या या ट्विटमध्ये एक व्यंगचित्र देखील शेअर केले आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता नितेश राणेंनी टि्वट करत टोला लगावला आहे. आणखी काय म्हणाले नितेश राणे..

नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर नाव न घेता टोला!

नितेश राणे यांनी हे व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर करताना त्यांनी बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, सामान्य जनता भोगतीये महाविकास आघाडीची सजा.. असे म्हणत आदित्य ठाकरे यांना चिमटा काढला आहे. व्यंगचित्रामध्ये आदित्य ठाकरे हे विमानात बसलेले दाखवले आहेत. ते विमानातून खाली पाहात आहेत. तर खाली चार व्यक्ती दाखवण्यात आले आहेत, त्यामध्ये एक शेतकरी आहे, दुसरा एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आहे, तर तिसरा व्यक्ती हा डॉक्टर असून, चौथा एसटी कर्मचारी आहे. या व्यंगचित्रामध्ये हे सर्वजण हात जोडून आपल्या समस्या सोडवण्याची विनंती करताना दिसत आहेत.

loading image
go to top