भाजपकडून नितीन गडकरींच्या सल्ल्याला केराची टोपली

सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावले पाहिजे असे नाही. उलट लोकांना असे राजकारण आवडत नाही.
भाजपकडून नितीन गडकरींच्या सल्ल्याला केराची टोपली

औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) )यांनी दिलेल्या सल्ल्याला भाजपच्या (BJP) स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. आयसोलेशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी शारीरिक अंतराचा फज्जा उडालेला दिसला. सोमवारी (ता.१७) आमदार अतुल सावे (MLA Atul Save) यांनी उभारलेल्या आयसोलेशन सेंटरचे (Corona) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadanvis) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी शारीरिक अंतराचा फज्जा उडालेला दिसला. (Nitin Gadkari Advise BJP Officer Bearers Not Follow Aurangabad News)

भाजपकडून नितीन गडकरींच्या सल्ल्याला केराची टोपली
नितीन गडकरी यांनी फडणवीसांचे कान टोचण्यासह केली हात जोडून विनंती

तिसऱ्या लाटेची तयारी

औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना आयसोलेशन सेंटर का सुरू केले जातंय असा सवालही उपस्थित झाला होता. यावर अतुल सावे यांनी उत्तर दिले आहे. सध्या कोरोनाची तिसरी लाट येणार आहे, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे आम्ही आयलोशेन सेंटर सुरु केले आहे. यात सर्वसामान्यांना मोफत आरोग्यसेवा देणार आहोत. समाजसेवा आणि आपले कर्तव्य म्हणून आयलोशेन सेंटर सुरु केले, असे सावे यांनी सांगितले.

गडकरींच्या सल्ल्याचाही विसर

नुकतीच नागपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात नितीन गडकरी म्हणाले, की कोविड काळात राजकारण करु नका. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावले पाहिजे असे नाही. उलट लोकांना असे राजकारण आवडत नाही. तुम्ही केलेल्या सेवा व कामांचा फार बागुलबुवा करु नका. कामे घरुन करा. कार्यकर्त्यांना गमावणे पक्षाला परवडणारे नाही. गडकरींच्या या सल्ल्याचाही औरंगाबादच्या (Aurangabad) पदाधिकाऱ्यांना विसर पडला का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com