nitin gadkari
nitin gadkarisakal

Big Breaking: ऑगस्ट महिन्यात इथेनॉलवर धावणारी गाडी बाजारात येणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा

भाजपने आज मुंबईत गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. मोदी सरकारच्या ९ वर्षपुर्ती निमित्ताने चर्चेचं आयोजन करण्यात आले होते. या चर्चेला नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली.

यावेळी नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली. ऑगस्ट महिन्यात इथेनॉल वर धावणारी गाडी बाजारात आणणार, चारचाकी व दुचाकी वाहने बाजारात येणार, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. 

गडकरी म्हणाले, ऑगस्टमध्ये टोयोटा गाडी लाँच करणार आहे. ही गाडी  १०० टक्के बायोइथेनॉलवर चालणार पेट्रोलच्या तुलनेत अवघ्या १५ रुपयांत लीटर इंधन उपलब्ध होईल. प्रदूषण शून्य असणार आहे. स्कूटर व चारचाकी गाड्या देखील बाजारात येणार आहे. 

नितीन गडकरी म्हणाले, आयुष्यमान भारत योजनेत ३७ करोड लोकांना फायदा झाला. पीएम किसान योजनेच्या ९.६ लोकांना गॅस कनेक्शन मिळाले. जनधन योजनेत ४९ करोड बँक अकाऊंट ओपन झाले. सर्वात गरीब नागरिकाला सन्मानाने उभे करण्याचा या  योजनेचे उद्देश आहे.

nitin gadkari
PSI भरती संदर्भात मोठी बातमी! 52 परीक्षार्थी कायमस्वरूपी डिबार; पोलिस महासंचालकांचा आदेश

प्रधानंत्री आवास योजनेअंतर्गत तीन ते साडेतीन करोड लोकांना घरे देण्यात आली. योजनांची आणि लाभार्थी याची लिस्ट फार मोठी आहे.

आर्थिक निती'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदल केला. विकासकाम होत आहेत कारण आर्थिक नितीमध्ये बदल होत आहेत. ९ वर्षात ५० लाख कोटींची काम आपण केली एकाही कामात भ्रष्टाचार झाला नाही,  कोणाचा आरोप नाही, पारदर्शक कारभार केला हे का झाल तर आमच्या सरकारने सर्व डिजिटल केल. यामुळे पारदर्शकपणा आला आणि भ्रष्टाचार झाला नाही, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

गडकरी म्हणाले, समाजवादी पक्षांना देशात स्थान राहिलं नाही. कम्युनिस्ट पक्षही हळूहळू संपली. भाजपच्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. राष्ट्रवाद , राष्ट्र प्रथम आणि ते राष्ट्र चालवायला चांगले सरकार .

nitin gadkari
Titanic Tourist Submarine: 'टायटॅनिक अन् टायटन पाणबुडीच्या अपघातात साम्य', जेम्स कॅमेरॉनची प्रतिक्रिया चर्चेत..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com