पालखी महामार्गाची पाहाणी केल्यानंतर गडकरी करणार मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मोठी मागणी Nitin Gadkari

महाराज पालखी मार्गाची आज खासदार रणजीत निंबाळकर व अधिकारी यांच्यासह पाहणी केली
Nitin Gadkari
Nitin Gadkari esakal

Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - ९६५) हा २३४ किमी लांबीचा मार्ग हडपसर (पुणे) - सासवड - जेजुरी - निरा - लोणंद - फलटण - नातेपुते - माळशिरस - बोंडले - वाखरी - पंढरपूर असा असून या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे.

या मार्गावर एकूण १२ पालखी स्थळे असून याठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि बाबींवर आधारित काम करण्यात येईल.

यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल. अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत दिली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पालकी महामार्गाची पाहाणी केली. यावेळी त्यांनी भिगवणमधील उजणी धरणावरून देखील पाहणी केली. यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे.

ते म्हणाले की, "आज उजणी धरणावरून आलो माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, एप्रिल-मे महिन्यात धरणातील पाणी कमी होते, अन् पुणे बंगरुळू रस्त्याकरिता रेती लागते. धरणातील जेवढा आपण गाळ काढू तेवढी धरणाची क्षमता वाढते महाराष्ट्र सरकराने काही मार्ग काढला तर या धरणातील गाळ काढून याची नैसर्गिकरित्या क्षमता वाढेल. अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com