मला 'या' गोष्टीची लाज वाटते, गडकरींचं नगरमध्ये वक्तव्य

Minister Nitin Gadkari
Minister Nitin Gadkarinitin gadkari

अहमदनगर : आज अहमदनगरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (union minister nitin gadkari) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) एकाच मंचावर आले आहेत. यावेळी रस्ते बांधणीबद्दल पवारांनी गडकरींचे कौतुक केले. त्यानंतर गडकरींनी देखील शेती उद्योगांच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्राचे कौतुक केले. त्याचवेळी गडकरींनी मला एका गोष्टीबाबत लाज वाटत असल्याचे वक्तव्य केले.

Minister Nitin Gadkari
'इथेनॉल निर्मिती क्षेत्रात पदार्पणाची गरज', पवार-गडकरी एकाच मंचावर

'या' गोष्टीची वाटते लाज -

पश्चिम महाराष्ट्राने दुधाच्या बाबतीत विकास केला आहे. शेतकरी दुधाच्या बाबतीत समृद्ध झाला. इकडे शेतकरी आत्महत्या करत नाही. पण, विदर्भात हा विकास झाला नाही. मदत डेअरीची बैठक झाली. यावेळी राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनिल केदार देखील उपस्थित होते. त्यावेळी विदर्भात ३ लाख लिटर दूध गोळा करत असल्याची माहिती मिळाली. त्यांना हे दूध संकलन १० लाखांपेक्षा अधिक व्हायला पाहिजे असं सांगितले. एकट्या पुणे, कोल्हापूर जिल्ह्यात दूध उत्पादन होतं, तितकं दूध उत्पादन विदर्भात होत नाही. याची आम्हाला लाज आणि शरम वाटते. तुम्हाला वाटते की नाहीतर माहिती नाही. पण, सुनिल केदार आणि मला वाटते, असा खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

आमच्याकडे टिश्यू कल्चरचा ऊस लागतो. आमच्याकडची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. कोल्हापूरची साखर कारखानदारी म्हणजे मेरीट विद्यार्थ्यांची शाळा आहे. मराठवाडा पहिल्या क्लासमधील विद्यार्थ्यांची शाळा आहे. त्याखाली विदर्भ येतो. त्यामुळे आता आम्ही देखील यावर काम करतोय. ऊसाच्या आपण वेगवेगळ्या जाती शोधून काढतो त्याचप्रमाणे आपल्या भागातील देशी गाई तयार करण्याचं प्रकल्पाला भारत सरकार मंजुरी देणार आहे. आपल्याकडच्या ज्या कमी दुधाच्या गाई आहेत, तंत्रज्ञानाचा उपयोग करून ३० लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाई तयार करून दुधाचे उत्पादन वाढवायचे. दिल्लीत मंत्री असलो तरी महाराष्ट्राचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे मी महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, असे गडकरी म्हणाले.

गाईचा गर्भ ट्रान्सप्लांट करणार -

गाईचा गर्भ ट्रान्सप्लांट करता येईल. महाराष्ट्राची वेटर्नरी इंडस्ट्री नागपुरात आहे. गाईचं लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं. चांगले दूध देणाऱ्या गाईच्या सांडाचं सिमेंन्स दिलं तर नक्कीच त्यातून २५ ते ३० लिटर दूध देणारी गोरी तयार होते. ९९ टक्के त्यामधून फक्त गोरीचं होते, गोरं होत नाही, असेही गडकरी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com