esakal | गडकरींना भावलं नाशिक! नाशिकमध्ये 'जे' आहे ते नागपुरलाही नाही..
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gadkari

गडकरींना भावलं नाशिक! नाशिकमध्ये 'जे' आहे ते नागपुरलाही नाही

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) त्यांच्या कामाच्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. रविवारी (ता.३) गडकरी यांच्या हस्ते पंचवटी भागातील पंडित दिनदयाळ उपाध्याय थीम पार्कचे लोकापर्ण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नाशिक शहराची स्तुती केली आणि म्हणाले.. नाशिकमधील 'या' दोन गोष्टी मला खूप आवडल्या.

नाशिकमध्ये मला दोन गोष्टी खूप आवडल्या

गडकरींना महाराष्ट्रातील शहरांच्या भौगोलिक परिस्थितीचं उत्तम ज्ञान असून त्यांनी नाशिकच्या वैशिष्यांबद्दल सांगितलं. तसेच त्यावेळी ते म्हणाले, नाशिकमध्ये दोन गोष्टी मला खूप आवडल्या. नाशिक सारख्या अभ्यासिका भारतात कुठेही नाहीत. इथले हवामान आमच्या नागपुरमध्येही नाही. येथील कार्यालये, त्यांना असलेली पार्किंग अतिशय उत्तम आहे. नाशिक ग्रीन आणि सुंदर असेच रहावे, असे नितीन गडकरी म्हणाले.

हेही वाचा: हम तो डूबेंगे.. लेकिन सनम तुमको भी लेकर डुबेंगे’- खडसे

शहराला सुंदर ठेवण्यासाठी आणखी प्रयत्न करावा

तसेच नाशिक शहराबद्दल बोलताना आपल्या पत्तीसोबत झालेला संवाददेखील गडकरी यांनी यावेळी सांगितला. माझी पत्नी विमानात माझ्यासोबत होती. नाशिकची शेती किती सुंदर आहे. गोदावरी सुंदर आहे. हवामान मस्त आहे, असं ती मला सांगत होती, असे नितीन गडकरी म्हणाले. तसेच नाशिक शहराचा विकास आणि हवामान याबद्दल बोलताना त्यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांनी शहराचा अभ्यास करावा. शहराला सुंदर ठेवण्यासाठी आणखी प्रयत्न करावा, असा सल्लादेखील दिला.

हेही वाचा: मंत्र्याच्या मुलाच्या ताफ्याने 4 जणांना चिरडले, शेतकऱ्यांकडून 4 भाजप कार्यकर्त्यांची हत्या

loading image
go to top