esakal | हम तो डूबेंगे.. लेकिन सनम तुमको भी लेकर डुबेंगे’! एकनाथ खडसेंचा भाजपवर निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse

हम तो डूबेंगे.. लेकिन सनम तुमको भी लेकर डुबेंगे’- खडसे

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधकांवर टीका केली. काहीही करा पण नाथाभाऊला जेलमध्ये टाका, यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. ईडीने (ED) दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये खोटे आरोप करण्यात आले आहेत. आपण जेलमध्ये जायला घाबरत नाही. ‘चार दिन भरके आयेंगे, हम तो डूबेंगे लेकिन सनम तुमको भी लेकर डुबेंगे’ असे ते म्हणाले. आयकर विभागाला सादर केलेल्या महितीपेक्षा जास्त मालमत्ता माझ्याकडे मिळाल्यास मी ती आरोप करणाऱ्या विरोधकांना दान करेल, असेही ते माजीमंत्री आमदार गिरीश महाजन (Girish mahajan) यांचे नाव न घेता म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षात आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते?

राष्ट्रवादी (NCP) पक्षात आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते याची आपल्याला माहिती मिळाली असल्याचं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केल्याने पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. खडसे म्हणाले की, भाजपमध्ये कोण कोण गद्दार होते आणि माझ्या मुलीचा पराभव केला हे मला राष्ट्रवादी पक्षात आल्यानंतर कळलं. खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका करताना आपण कुणाच्या कृपेने आमदार झाले याची आठवण ठेवावी. उगाच जामनेरवाल्याच्या कानातील कुरघोड्या ऐकत बसू नये, जामनेरवाल्यानेच आपल्या मागे ईडी (ED) लावली, वेगवेगळ्या चौकशा लावल्या,इन्कम टॅक्स लावल्या, रेड झाल्या, मात्र त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं समोर आलं. मात्र तरीही आता ईडी लावण्यात आली आहे, असं खडसे म्हणाले.

हेही वाचा: ड्रग्ज प्रकरण: आर्यन खानला मोठा दिलासा

ईडीने लावलेल्या चार्जशिटचा विचार केला तर आपल्यावर कलियुगात कुणी कुणावर लावले नसतील, इतके नको नको ते आरोप लाऊन, कुणाकुणाशी संबंध जुळवून आपल्याला मास्टर माईंड ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ दोन कोटी रुपयांच्या कर्जांसाठी ईडी लावण्यात आली. जे कर्ज आपण नियमानुसार व्याजासह फेडले आहे. सर्व सामान्य पणे ईडी कोणाला लावली जाते. ज्या ठिकाणी हजार बाराशे कोटी वर मनी लॉन्ड्रिंग झालं असेल. मात्र आपल्याला केवळ दोन कोटी रुपयांसाठी ईडी चौकशी लावण्यात आली आहे. केवळ छळण्यासाठी हे केले जात आहे, असं ते म्हणाले.

हेही वाचा: उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधींना अटक, काँग्रेसचा दावा

loading image
go to top