संप मागे घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; वीज कर्मचाऱ्यांसोबतची बैठक रद्द

मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाईल; कर्मचाऱ्यांना इशारा
Nitin Raut on Electricity Worker Strike
Nitin Raut on Electricity Worker Strike Team eSakal
Updated on

मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाईल; कर्मचाऱ्यांना इशारा

उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी होणारी महावितरण कर्मचाऱ्यांसोबतची उद्याची बैठक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. संप मागे घेण्याचं आवाहन करूनही कर्मचारी संघटनांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळतेय. सर्व वीज कर्मचारी संघटनासोबत ही बैठक पार पडणार होती.

Nitin Raut on Electricity Worker Strike
माजीमंत्री सावंत म्हणाले..! शिवसेनेचा मुख्यमंत्री, तरीही अर्थसंकल्पात दहा टक्‍केच निधी

वीज कर्मचारी आपल्या काही मागण्या घेऊन आंदोलन करणार आहेत. कर्मचारी संघटनांनी हा इशारा दिला आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनांशी बैठक घेऊन मार्ग सोडवण्याच्या विचारातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करु मात्र, त्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन नितीन राऊत यांनी केलं होतं. मात्र कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याची भूमिका न घेतल्याने ही बैठक रद्द झाली आहे.

Nitin Raut on Electricity Worker Strike
IPL सुरक्षेसंदर्भात गृहमंत्री, शरद पवारांमध्ये खलबतं; काय झाली चर्चा?

दरम्यान, उद्या ३ वाजता ही बैठक होणार होती. मात्र आता कर्मचारी संघटनांनी संप केल्यास, तसंच नियमांचं उल्लंघन केल्यास मेस्मा अंतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. वीज कंपन्यांचे खासगीकरण होणार नाही अशी ग्वाहीही राज्य सरकारने यावेळी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com