IPL सुरक्षेसंदर्भात गृहमंत्री, शरद पवारांमध्ये खलबतं; काय झाली चर्चा?

राजकीय चर्चेबाबत गृहमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण
Sharad Pawar_Walase Patil
Sharad Pawar_Walase Patil

मुंबई : महाराष्ट्रात होत असलेल्या इंडियन प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या सुरक्षेसह ११ कोटी रुपयांच्या थकबाकीच्या विषयावर आज राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीला वळसे पाटील, पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विजय पाटील, सी. एस. पाटील, जगदीश आचरेकर आदी उपस्थित होते. (Home Minister Dilip Walase and Sharad Pawar Discussion over IPL security)

Sharad Pawar_Walase Patil
Aryan Khan Case : आरोपपत्र दाखल करण्यासाठी SIT नं वाढवून मागितली मुदत

या बैठकीत राजकीय चर्चा झाली का? याबाबत माहिती देताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, "शरद पवारांसोबत झालेल्या आजच्या बैठकीत कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. अशी चर्चा आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी करतो"

Sharad Pawar_Walase Patil
पुतीन रशियाचं राष्ट्राध्यक्षपद गमावणार का? काय असेल धोका?

दरम्यान, आयपीएलकडून जवळपास 11 कोटी रूपये थकबाकी मुंबई पोलिसांना देणे बाकी आहे. याबाबत या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. याबाबत बोलताना विजय पाटील म्हणाले की, "आमची बैठक चांगली झाली. IPL चे सामने मोठ्या संख्येनं पहिल्यांदा महाराष्ट्राला मिळाले आहेत. आत्तापर्यंत आम्हाला पोलिसांचं चांगलं सहकार्य मिळालं आहे. आयपीएल संदर्भातील सर्व प्रश्न, अडचणी आम्ही शरद पवार यांच्यासमोर मांडल्या आहेत. आमच्या या काही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला खात्री आहे. लवकरच थकबाकी संदर्भातील माहितीही आम्ही देऊ"

अस्लम शेख, वर्षा गायकवाड, संप, पेन ड्राईव्ह प्रकरणांवरही चर्चा

शरद पवारांसोबतच्या या बैठकीत अस्लम शेख, वर्षा गायकवाड, संप, पेन ड्राईव्ह या विविध विषयांवरही चर्चा पार पडली. गृहमंत्री म्हणाले, अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांच्यावरील गुन्ह्यासंदर्भात मला काही माहीत नाही. नाना पटोलेंच्या वादग्रस्त विधानामध्ये तथ्य असेल तर त्यांच्यावर करावाई केली जाईल. पण तथ्य नसेल तर स्थानिक अधिकाऱ्यांना याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. दोन दिवस असलेल्या विविध कामगार संघटनांच्या भारत बंदबाबत बोलताना पोलीस यंत्रणा सतर्क असतात त्यांचं काम ते करत आहेत, असंही वळसे यावेळी म्हणाले. पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीकडं दिल्यानं मुख्यमंत्री नाराज नाहीत. त्यांच्याशी यावर माझं बोलणं झालं आहे, त्यांनी माझं अभिनंदन केलं. तसेच संजय पांडेंची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी करण्यात आलेली नियुक्ती ही कोणालाही अडचणीत आणण्यासाठी केलेली नाही, असंही वळसे पाटील यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com