esakal | 'केंद्राने मदत केली तर वीज बील माफ केलं जाऊ शकतं'- नितीन राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

nitin raut

'केंद्राने मदत केली तर वीज बील माफ केलं जाऊ शकतं'- नितीन राऊत

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: 'राज्यात सध्या वीज बील माफी शक्य नाही, त्यासाठी जर केंद्राने मदत केली तर विचार केला जाऊ शकतो, असं मत राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी औरंगाबादेत व्यक्त केले. राऊत आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील कुरबुरी प्रसार माध्यमांमधून समोर आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी बातचीत केली.

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमच्यामध्ये चांगला समन्वय आहे. यामुळे सरकारचा पाच वर्षाचा कालावधी नक्की पुर्ण करेल. दुसरीकडे भाजपाने सारखं सरकार पडेल याची अपेक्षा बाळगू नये असा टोला राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपला लगावला.

हेही वाचा: तब्बल बारा वर्षांनंतर औरंगाबाद विमानतळाला पाणी मिळालं

महाविकास आघाडीतील आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील जनतेची एकत्रिपणे सेवा करत राहू. त्यामुळे भाजपने सरकार पाडण्याच्या भानगडीत पडू नये, असेही राऊत म्हणाले. वीजबील माफी संदर्भात विचारले असता, बील माफी करणे शक्य नाही, त्यासाठी स्वतंत्र तरतूद किंवा केंद्राने अनुदान दिले तरच या संदर्भात काही निर्णय घेणे शक्य आहे, अन्यथा वीजबील भरावेच लागेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.