सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांना स्वातंत्र्यवीर काझी पुरस्कार

पीटर चौधरी; शाहू स्मारक भवनात शनिवारी होणार वितरण सोहळा
Shriram Pawar
Shriram Pawaresakal

कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी सद्‌भावना केंद्रातर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी सद्‌भावना पुरस्कार सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांना जाहीर झाला. सन्मानचिन्ह, रोख दहा हजार रुपये, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पीटर चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शनिवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पुरस्काराचे वितरण होईल.

दरम्यान,ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक सुधींद्र कुळकर्णी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, प्रा. रोहन चौधरी (पुणे), प्राचार्य राजेंद्र लोखंडे, उपप्राचार्य टी. के. सरगर, वीरपत्नी श्रीमती अशरफबी काझी, सद्‌भावना केंद्राचे संस्थापक एन. एन. काझी उपस्थित राहणार आहेत.

श्री. चौधरी म्हणाले, 'श्रीराम पवार यांची भारताचे परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक अशी ओळख आहे. राजकीय, सामाजिक, सहकार, आर्थिक क्षेत्रासह नागरीकीकरण, पर्यावरण, दहशतवाद आदी विषयावर त्यांनी निर्भिड लेखन केले आहे. त्यांच्या आजवरच्या एकूणच निर्भीड पत्रकारितेसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यापूर्वी ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे आदींना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.'

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात काझी

यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘अगर आपको जिंदा शहीद देखना है, तो निजामुद्दीन काझी को देखो’ असे म्हटले होते. जीवनाच्या अंतिम क्षणी भारतात वाढत असलेला जातीयवाद, भ्रष्टाचार संपला पाहिजे, अशी काझी यांची इच्छा होती. त्यांच्या देशाप्रती असलेल्या सद्‌भावनेचा विचार जोपासण्यासाठी सद्‌भावना केंद्राची स्थापना केली असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान श्री. चौधरी, ॲड. गुलाबराव घोरपडे, गणी आजरेकर, मधुकर रामाणे, सचिन जाधव, बाळासाहेब देसाई, अजितराव निकम, रवींद्र मोरे, आझाद आलासे, प्रभाकर पाटील, उमेश भोगावकर, डॉ. शिवाजीराव हिलगे, सौ. वैभवीताई जरग, नितीन पाटील, शहानूर कमालशा, संदीप जाधव संयोजक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com