अजित पवारांच्या कोणत्याही संपत्तीवर टाच नाही; वकिलांचं स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपत्तीवर आयकरने छापे मारल्याची चर्चा सुरु होती.
Ajit Pawar
Ajit Pawaresakal

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेगवेळ्या संपत्तीवर आयकर विभागाने छापे मारल्याचे वृत्त आज सकाळी समोर आले होते. महाराष्ट्रातील चरंडेश्वर साखर कारखान्यासह वेगवेळ्या कोट्यवधींच्या संपत्तीवर आयकरने छापे मारल्यानंतर महाराष्ट्राबाहेरील संपत्तीवर देखील आयकर विभागाची नजर असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता अजित पवार यांच्या वकिलांकडून आयकर विभागाकडून कोणतीही नोटीस आली नसल्याचं सांगण्यत येतंय.

Ajit Pawar
"नवाब मलिक जावयामुळे वेडे झालेले जगातील पहिले सासरे"

प्रसार माध्यमांमधून समोर आलेले वृत्त हे निराधार असून ते जाणीवपुर्वक पेरलेले होते, हे सर्व वृत्त वस्तुस्थितीशी विसंगत असून खोडसाळपणाने प्रेरित होते असं अजित यांच्या वकिलांनी सांगितलं. तसंच त्यांच्या कुठल्याच संपत्तीवर आयकर विभागाने कोणतीच नोटीस दिली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आयकर विभागाच्या कोणत्याही कारवाईशी अजित पवार यांचा काही संबंध नसून, आयकर विभागाकडून प्राप्त पत्राला कायदेशीर उत्तर देणार असल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात आलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com