"नवाब मलिक जावयामुळे वेडे झालेले जगातील पहिले सासरे"

Nawab-Malik
Nawab-Maliksakal media

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. मलिक केवळ एक आरोप करून थांबले नाहीत, तर या संपूर्ण प्रकरणात ते दररोज पत्रकार परिषद घेऊन एखादा नवा खुलासा करत असतात. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर आरोपांची सरबत्ती सुरू केल्यानंतर भाजपाने आर्यन खान प्रकरणात उडी घेतली.

समीर वानखेडे सच्चा अधिकारी असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं. तसेच अन्य भाजपवासियांनीही वानखेडे यांना पाठिंबा दर्शवला. ते कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचं म्हटलं. आता, भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे. यासाठी त्यांनी ट्वीट करत मलिक यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे.

नवाब मलिक रोज डोक्यात वारा शिरल्यासारखं बरळतायत. हाती पुरावे असतील तर कोर्टात जा की? नाहीतर वर्गणी काढून यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करा", असं ट्वीट भातखळकरांनी केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com