विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत मनसेचे ठरता ठरेना!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

- आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दोन मतप्रवाह.

- आता यावर निर्णय अद्याप होऊ शकला नाही.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणुका लढविण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र, ही बैठक कोणत्याही निर्णयाविनाच झाली. 

मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नाही. मात्र, राज ठाकरे यांनी सातत्याने प्रचारसभांचा धडाका लावत सत्ताधारी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर आता मनसे विधानसभा निवडणूक लढविणार का याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे समोर आले. त्यामुळे आता यावर निर्णय अद्याप होऊ शकला नाही.

Vidhan Sabha 2019:निर्णयाविनाच संपला रामराजे निंबाळकरांचा मेळावा; पाहा काय घडले?

दरम्यान, विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत राज ठाकरे मनसेची भूमिका लवकरच स्पष्ट करतील, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी बैठकीनंतर दिली.

काँग्रेसला आणखी एक पाटलांकडून धक्का; शिवसेनेत प्रवेश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no any decision taken from Raj Thackeray regarding Contest Assembly Election