

Maharashtra Government RTI anna hazare devendra fadanvis
esakal
Devendra Fadnavis RTI : माहिती अधिकार कायद्यात राज्य सरकारने केलेल्या वादग्रस्त बदलांना अखेर तूर्तास स्थगिती दिली. समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बदलांविरोधात उपोषणाचा इशारा दिला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हस्तक्षेप करत राज्य माहिती आयोगाला पत्र पाठवले. अण्णा हजारे यांच्याशी चर्चा होईपर्यंत कोणतेही बदल लागू करू नयेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर मुख्य माहिती आयुक्तांनी १२ जूनच्या अधिसूचनेतील बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.