esakal | राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झालेला नाही - राजेश टोपे
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Tope

राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झालेला नाही - राजेश टोपे

sakal_logo
By
अमित उजागरे

राज्यात ऑक्सिजनअभावी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. याबाबत आम्ही हायकोर्टात प्रतिज्ञापत्रही सादर केलं आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. देशात ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू झालेला नाही असं केंद्र सरकारनं काल संसदेत सांगितलं होतं. त्यावरुन केंद्रावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर टोपे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. (No Covid patient died due to lack of oxygen in maharashtra Rajesh Tope aau85)

राज्यात ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. सरकारनं याबाबत हायकोर्टात याबाबत प्रतिज्ञापत्रही सादर केलं आहे. ऑक्सिजनची कमतरता भरुन काढण्यासाठी आम्ही औद्योगिक क्षेत्रातला शंभर टक्के ऑक्सिनजचा पुरवठा हा रुग्णांसाठी दवाखान्यांकडे वळवला होता, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी राज्यसभेत विरोधकांनी केंद्र सरकारला कोरोनाच्या दुसरी लाटेची परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही असा आरोप करत जोरदार टीका केली. यावेळी विरोधकांच्या आरोपांचे खंडन करताना आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार राज्यसभेत सांगितलं की, "आरोग्य हा राज्याचा विषय आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती केंद्र सरकारला दिली आहे. केंद्राच्या आदेशानुसार मृत्यूचे रिपोर्ट राज्यांनी दिले आहेत. यामध्ये कोणत्याही राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळं एकही मृत्यू झाल्याची नोंद आढळलेली नाही."

loading image