esakal | नागपूरसह राज्यात आणखी निर्बंध लागणार का? वडेट्टीवारांनी दिले उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

विजय वडेट्टीवार

नागपूरसह राज्यात आणखी निर्बंध लागणार का? वडेट्टीवारांनी दिले उत्तर

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : नागपूरचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री नितीन राऊत (minister nitin raut on lockdown) यांनी नागपूर हे तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असून येत्या तीन-चार दिवसांत निर्बंध लागणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे नागपुरातील व्यापारी आणखी आक्रमक झाले होते. संपूर्ण राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आता नागपूरसह राज्यात आणखी निर्बंध लागणार का? (Restrictions in maharashtra) याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (minister vijay wadettiwar) यांनी उत्तर दिले आहे.

हेही वाचा: नागपूर : कोरोनाची तिसरी लाट?, वीकएंड लॉकडाऊनची घोषणा

तिसरी लाट येणार हे अटळ आहे. सध्या तिसरी लाट उंबरठयावर आली आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. राज्यातील सर्व जिल्हयात ॲाक्सीजन प्लांट, स्टोअरेज टॅंक लागलेय. तिसऱ्या लाटेत ॲाक्सीजनचा तुटवडा जाणवणार नाही. मात्र, दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत जास्त रुग्ण येतील. दुसऱ्या लाटेत अंदाज नसल्याने नियोजनात अभाव होता. त्यामुळे तिसऱ्या लाटेत खबरदारी घेतोय. गर्दी कुणीच करु नये, असे आवाहन वडेट्टीवारांनी केले आहे.

नागपूरसह राज्यात निर्बंध लागणार का? याबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, ''कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागले तर संपूर्ण राज्यात लागेल. निर्बंध हे चार टप्प्यात लागणार. निर्बंध लावायचे की नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतात. अद्यापतरी राज्यात निर्बंध कडक करणार असं सुतोवाच नाही. तसेच निर्बंध लागण्याची शक्यता कमीच आहे. पालकमंत्री म्हणून नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असावी, याबाबत माहिती नाही. माहिती घेऊन सांगतो.''

दरम्यान, १६७०० कोटी रुपये मदत आणि पुनर्वसन खात्याकडून शेतकऱ्यांना मिळाले. आत्ता झालेल्या नुकसानीची मदत वेगळी आहे. तीन पक्षाचं सरकार चालणार नाही, अशी अनेकांची भावना होती. मात्र, तीन पक्षाचं हे सरकार फेवीकॅालप्रमाणे घट्ट झालंय. तुटेगा भी नाही और छुटेगा भी नहीं, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

loading image
go to top