esakal | नागपूर : कोरोनाची तिसरी लाट?, वीकएंड लॉकडाऊनची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

नागपूर : कोरोनाची तिसरी लाट?, वीकएंड लॉकडाऊनची घोषणा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : कोरोनाच्या संसर्गात थोडीशी वाढ दिसत आहे. विशेष असे की, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनाची लागण होत आहे. यामुळे दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता, ही धोक्याची घंटा असून तिसऱ्या लाटेचे संकेत दिसत आहेत. उंबरठ्यावर आलेल्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करतानाच आणखी एकदा कठोर निर्बंधांना नागपूरकरांना पुढे जावे लागेल. पुढील तीन दिवसात हे निर्बंध लागू होतील, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिली.

गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्याने कोरोना बाधितांची दोन आकडी संख्या गाठली आहे. त्यामुळे वेळीच निर्बंध लावणे आवश्यक आहे. पुढील दोन-तीन दिवसात व्यापारी, उद्योजक या घटकांसोबत बैठका घेण्यात येतील. त्यानंतर जिल्ह्यात कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात येईल. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोरोनासंदर्भात झालेल्या आढावा घेण्यात आला. यानंतर पालकमंत्री डॉ. राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा: विजय वडेट्टीवार म्हणाले, एका बापाची अवलाद असशील तर...

बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी विमला आर., महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त अस्वती दोरजे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्यासह कोविड टास्क फोर्सचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची व शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यवसायी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या बैठकी घेऊन कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासन घेईल. पुढील तीन दिवसांत यासंदर्भातील निर्णय घोषित करावा. सध्या रात्री दहापर्यंत हॉटेल्स सुरु आहेत, मात्र निर्बंध लावल्यानंतर रेस्टॉरंट ८ तर दुकाने ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, त्यावेळेत कपात करण्याबाबतचे सुतोवाच या बैठकीत करण्यात आले.

हेही वाचा: पाच जण बुडून मेल्याचे प्रकरण : तिघांचे मृतदेह सापडले

प्रशासनामार्फत पुढील तीन दिवसानंतर नागपूर जिल्ह्यातील निर्बंधाची घोषणा केली जाणार आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, गर्दी टाळणे आवश्यक असून दोन लसी घेतलेल्या नागरिकांपासून सगळ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले...

  • -मेडिकलमध्ये २०० खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव

  • -शासकीय, खासगीत ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता

  • -ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध

  • -मेडिकलमध्ये ४० खाटांचे ३ आयसीयू

  • -मेडिकल, मेयोमध्ये प्रत्येकी दोन लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प

  • -जीनोम सिक्वेसिंगसाठी ७२ नमुने प्रयोगशाळांकडे पाठवले

असे असतील निर्बंध

  • -रेस्टॉरेंन्ट : रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असतील

  • -दुकाने : दुपारी ४ वाजेपर्यंत पर्यंत सुरू असतील

  • -विकेंडला लॉकडाऊन

loading image
go to top