
राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढतीच; टोपेंचं मोठं विधान
मुंबई : राज्यात कमी झालेल्या कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होतान दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता काही प्रमाणात वाढली आहे. दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये वाढणाऱ्या कोरोना रूग्णसंख्येदरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. (Rajesh Tope On Maharashtra Rising Covid Cases )
टोपे म्हणाले की, मुंबई, पुणे आणि ठाण्यातील काही भागात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहोत. राज्यात आज 3,475 कोरोनाचे सक्रिय रूग्ण असून, त्यातील सुमारे 2500 रूग्ण हे मुंबईतील आहेत. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे 2500 पैकी एकही रूग्ण रूग्णालयात दाखल नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. टोपेंच्या या विधानामुळे वाढत्या रूग्णसंख्येत नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मंकीपॉक्सबाबत टोपे म्हणतात
कोरोनानंतर मंकीपॉक्सबाबत बोलताना टोपे म्हणाले की, मंकी पाॅक्स या संसर्गजन्य रोगाचा, तर राज्यात काय तर देशात देखील या आजाराचा एकही रुग्ण सध्या नाही. दक्षिण अफ्रिकेतून या आजाराचा प्रसार होत आहे. जनावराच्या संपर्कातून माणसाला या आजाराची लागण होत असल्याचे समोर आले आहे. आपल्या देशात अद्याप एकही मंकी पाॅक्सचा रुग्ण आढळलेला नाही. हा संसर्गजन्य रोग आपल्या देशात येऊ नये यासाठी विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळांवर तपासणी केली जात असल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: राज्यात कोरोना वाढतोय! 711 नव्या बाधितांची नोंद
मुंबईतील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 6 टक्क्यांवर; अलर्ट राहण्याच्या सूचना
मुंबईतदेखील नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून, येथील रूग्ण बाधित होण्याचा दर 6 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे काहिशी चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुंबईतील वाढता पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घेता कोविड चाचण्या करण्याला गती दिली जाईल, असे मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतर शहरातील लक्षणे असणाऱ्या नागरिकांच्या चाचण्या युद्धपातळीवर वाढवण्याच्या सूचनांसह प्रयोगशाळा सुसज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या सूचना काय
वाढत्या पॉझिटिव्हिटी रेटनंतर मुंबईतील कोरोना चाचण्यांची संख्या युद्धपातळीवर वाढवण्यात येणार आहे. तसेच टेस्टिंग लॅब आणि कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
१२ ते १८ वयोगटातील लसीकरण वाढवावे, तसेच बुस्टर डोसची संख्याही वाढवावी.
जंबो कोविड सेंटर पुन्हा सज्ज करावेत. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अलर्ट करावेत
Web Title: No Need To Worry Maharashtra Health Minister Rajesh Tope During Corona Cases Rise In Maharashtra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..