काँग्रेसचा अधिकृत प्रस्ताव नाही : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, की याविषयी मी काही बोलणार नाही. माझ्याशी कोणी अधिकृत बोललो तर मी त्यावर बोलेन.

मुंबई : शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, की याविषयी मी काही बोलणार नाही. माझ्याशी कोणी अधिकृत बोललो तर मी त्यावर बोलेन.

काँग्रेसने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या आमदारांना काँग्रेसशासित राजस्थानातील जयपूरमध्ये ठेवले आहे. जयपूरमध्ये काँग्रेसचे 25 ते 30 आमदार असून, आज (रविवार) काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी या सर्वांसोबत बैठक घेतली. मावळत्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपकडून काँग्रेस आमदारांना आमिष दाखवले जात असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सावध झाला आहे. आज झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सहमती झाल्याची चर्चा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No official proposal of Congress says ncp leader Sharad Pawar