राज्यात गेल्या चार दिवसांमध्ये एकही ओमिक्रॉनच्या रुग्णाचे निदान नाही

राज्यात डिसेंबरच्या अखेरपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्याने टिपले.
Omicron
Omicronsakal

पुणे - राज्यात (Maharashtra) गेल्या चार दिवसांपासून ओमिक्रॉनच्या (Omicron) एकाही रुग्णाचे (Patient) निदान झाले नाही. त्यामुळे राज्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला ओमिक्रॉन विषाणूंचा उद्रेक ओसरत असल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यात डिसेंबरच्या अखेरपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्याने टिपले. कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांचे प्रमाण त्यात सर्वाधिक होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून बेसुमार वेगाने कोरोनाचे रुग्णांचे निदान होऊ लागले. एकाच घरातील तीन ते पाच जणांना कोरोना झाल्याचे निदान होत होते. त्यात लहान मुलांचाही यावेळी समावेश होता. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमिवर काही निर्बंध घालण्यात होती. मात्र, कोरोनाचा ओमिक्रॉन हा सौम्य असल्याचे दोन आठवड्यानंतर दिसू लागले. त्यामुळे निर्बंध पुन्हा शिथिल केले, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले.

Omicron
पुण्यात उरले आता १४,३५२ सक्रिय कोरोना रुग्ण; रविवारी दिवसात २७४६ नवे रुग्ण

राज्यात एका दिवशी कोरोनाचे तीन लाख दोन हजार ९२३ सक्रिय रुग्णांची संख्या होती. ती आता एक लाख ३३ हजार ६५५ पर्यंत कमी आली आहे. त्यामुळे ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग ओसरत आहे, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात सहा लाख ९८ हजार ३५४ सक्रिय रुग्ण होते. त्या तुलनेने तिसऱ्या लाटेत रुग्णांच्या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत असले तरीही त्यातून अत्यवस्थ होणाऱ्या आणि रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होता. चार ते पाच दिवसांमध्ये रुग्ण व्यवस्थित बरा होत होता. त्यातून मोठा दिसला मिळत असल्याचे डॉ. संजय कदम यांनी सांगितले.

राज्यात मुंबईमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनचे एक हजार ८० रुग्ण आढळले आहेत. तर, पुणे महापालिकेत ही संख्या एक हजार २४४ पर्यंत वाढली. पिंपरी-चिंचवडमध्ये हे प्रमाण १२७ होते.

राज्यात नऊ हजार ६६६ नवीन रुग्ण

राज्यात कोरोनाच्या नऊ हजार ६६६ नवीन रुग्णांचे निदान झाले. आतापर्यंत सात कोटी ५५ लाख ५४ हजार ७९८ प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ७८ लाख तीन हजार ७०० (१०.३३ टक्के) रुग्णांना कोरोना झाला. सध्या राज्यात सात लाख २४ हजार ७२२ रुग्ण घरात विलगिकरणामध्ये आहेत. तर, दोन हजार ३९४ रुग्ण रुग्णालयात विलगिकरणात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com