पुण्यात उरले आता १४,३५२ सक्रिय कोरोना रुग्ण; रविवारी दिवसात २७४६ नवे रुग्ण

पुणे शहरात आता १४ हजार ३५२ सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत. तेरा दिवसांपुर्वी म्हणजेच २४ जानेवारी २०२२ ला शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही ४६ हजार ३०२ झाली होती.
Corona Patients
Corona PatientsSakal
Summary

पुणे शहरात आता १४ हजार ३५२ सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत. तेरा दिवसांपुर्वी म्हणजेच २४ जानेवारी २०२२ ला शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही ४६ हजार ३०२ झाली होती.

पुणे - पुणे शहरात (Pune City) आता १४ हजार ३५२ सक्रिय कोरोना रुग्ण (Corona Patients) उरले आहेत. तेरा दिवसांपुर्वी म्हणजेच २४ जानेवारी २०२२ ला शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही ४६ हजार ३०२ झाली होती. पुणे जिल्ह्यात रविवारी (ता.६) दिवसात २ हजार ७४६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्यासुद्धा ३० हजारांचा आत आली आहे. रविवारी जिल्ह्यातील १४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे‌. जिल्ह्यातील दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील नऊ, पिंपरी चिंचवडमधील चार आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एका मृत्यूचा समावेश आहे. नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात रविवारी दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रोज प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या कोरोना रुग्ण आकडेवारी अहवालावरून हे स्पष्ट झाले आहे.

Corona Patients
पुणे : मुळामुठेचे संवर्धन अल्प खर्चातही शक्य आहे

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ७ हजार ५३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ४३४ रुग्ण आहेत. दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये ७२२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ४४९, नगरपालिका हद्दीत ८० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ६१ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांमध्येही पुणे शहरातील सर्वाधिक ३ हजार ८९६ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २ हजार १३८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार १५४, नगरपालिका हद्दीतील २८६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ६१ जण रविवारी दिवसात कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com