esakal | नवाब मलिक यांचा सोमय्यांच्या मुलावर खंडणी वसुलीचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

नवाब मलिक यांचा सोमय्यांच्या मुलावर खंडणी वसुलीचा आरोप

sakal_logo
By
रश्मी पुराणिक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (hasan mushrif) आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी उत्तर दिले आहे. "भाजपाच्या माध्यमातून आधीपासून बिनबुडाचे राजकीय हेतूने आरोप करण्यासाठी किरीट सोमय्या (kirit somaiya) ओळखेले जातात"

"2012 पासून मंत्र्यांना, सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले. ह्यात किरीट सोमय्या यांचा समावेश आहे. यात त्यांनी भाजप नेत्यांच्या कंपनीची नाव घेतली होती. त्यामुळे त्यांचे पद गेले" असे नवाब मलिक म्हणाले.

हेही वाचा: राऊतांची तालिबानी वृत्ती रश्मी ठाकरे ठेचणार का? चित्रा वाघ यांचा सवाल

"हे राजकीय हेतुने सरकारला बदनाम करण्यासाठी बोलतात. त्यांच्या आरोपात तथ्य नाही. लोक दोषमुक्त होत आहेत" असे मलिक यांनी सांगितले. "विधानसभा निवडणुकीआधी 2019 आधी मुश्रीफ यांच्या कारखान्यावर घरावर छापेमारीची कारवाई झाली. काही मिळालं नाही. टॅक्स चुकवला तर एजन्सीला कारवाई करण्याचा अधिकार आहे. छापेमारी झाली, दोन वर्षे झाली तरी कारवाई झाली नाही. किरीट सोमय्या यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. सोमय्या साहेबांना कोणी सिरीयसली घेत नाही" अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

खंडणी वसुलीचा आरोप

"नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या यांच्या मुलाबाबत गंभीर विधान केले आहे. इतरांच्या पोरांवर बोट दाखवता, स्वतःची पोरं काय करतात ते बघा. तुमचा मुलगा कोणाला फोन करतो, खंडणी वसूल करतो. कसे मनी लाँडरिंग करतो, हे लोकांना माहीत आहे" असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

अनिल देशमुखांबाबत म्हणाले...

अनिल देशमुख देशात आहेत. राज्यात आहेत. आपल्या कुटुंबीयांबरोबर आहेत.

ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको अशी पक्षाची भूमिका आहे. पण कोर्ट ऑर्डर आहे. निवडणूक टाळता येत नसेल, तर कायदा करून आरक्षण देण्याचा प्रस्ताव सरकारपुढे आहे. जर निवडणूक झाली, तर राष्ट्रवादी पाच जिल्ह्यात ओबीसी उमेदवार देणार अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

loading image
go to top