Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत
वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅझेटमधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचा निष्कर्ष मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या माजी न्या. संदीप शिंदे समितीने काढला आहे.
मुंबई - हैद्राबाद गॅझेट, मुंबई गॅझेट आणि सातारा गॅझेट या तिन्ही गॅझेटमध्ये कोणत्याही समाजाच्या वैयक्तिक नोंदी नाहीत. तर या तिन्ही गॅझेटमध्ये समाजातील विविध जातींची तत्कालीन लोकसंख्येची आकडेवारी आहे.