Prakash Ambedkar I कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी प्रकाश आंबेडकरांचे नावं? वंचितने स्पष्ट केली भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी प्रकाश आंबेडकरांचे नावं? वंचितने स्पष्ट केली भूमिका

अगामी येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे.

कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी प्रकाश आंबेडकरांचे नावं? वंचितने स्पष्ट केली भूमिका

सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. अगामी येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान, काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित बहुजन आघाडीने हे वृत्त फेटाळलं आहे.

काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. शिवाय निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट खोट्या बातम्या पेरण्याचं काम करत असतो, असं वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केलं आहे. याबाबत वंचितने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. यात त्यांनी हा खुलासा केला आहे.

हेही वाचा: मंदिर मस्जिद वादावर आशुतोष राणांचं काव्यमय उत्तर, व्हिडिओ व्हायरल

प्रसिद्धीपत्रकात जारी केल्याप्रमाणे, या बातमीत काहीही तथ्य नसून काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अजूनही प्राप्त झालेला नाही. निवडणुका जवळ आल्या की, काँग्रेसमधील एक गट माध्यमातील काही लोकांना हाताशी धरुन खोट्या बातम्या पेरण्याचे काम करत असतो. अशा खोट्या बातम्या पेरुन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरुन चढाओढ पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची जोरदार चर्चा रंगली असतानाच प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती.

हेही वाचा: राऊतांकडून बृजभूषण सिंहांचे कौतुक म्हणाले, लढवय्या माणूस..

राज्यसभेची उमेदवारी देऊन काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे (consensus candidate) असू शकतात का याचीही चाचपणी सुरु असल्याचं म्हटलं जात होतं. त्यातच प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच के पाटील यांची काही दिवसांपूर्वी मुंबईत भेट झाली होती. या भेटीत येणाऱ्या काळातील निवडणुकांमध्ये काही आघाडी होऊ शकते का याची चर्चा झाली.

Web Title: No Proposal Form Congress Says Prakash Ambedkar Candidate For Rajya Sabha Vanchit Aaghadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top