Stamp Duty
Stamp DutySakal

सोलापुरात 500 रुपयांच्या स्टॅम्पचा तुटवडा नाही! जिल्ह्यात 500 रुपयांचे 30,601 तर 100 रुपयांचे 85,350 रुपयांचे स्टॅम्प आहेत; डिसेंबरसाठी स्टॅम्प मागणीचा प्रस्ताव

Published on

सोलापूर : शंभर-दोनशे रुपयांच्या स्टॅम्पवर निर्बंध घातल्यानंतर प्रत्येक खासगी दस्ताऐवजासाठी ५०० रुपयांचा स्टॅम्प बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे पाचशे रुपयांच्या स्टॅम्पला मागणी वाढली असून काही जिल्ह्यांमध्ये त्याची कमतरता आहे. पण, सोलापूर जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात स्टॅम्प उपलब्ध असल्याचे मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात सध्या शंभर रुपयांचे ८५ हजार ३५० आणि पाचशे रुपयांचे ३० हजार ६०१ स्टॅम्प असल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com