शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

राज्यातील शाळांना दरवर्षीप्रमाणे यंदाही २ मेपासून १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्ट्या असणार आहेत. परंतु, यावर्षी जनगणनेच्या कामकाजाला सुरवात होणार असल्याने शिक्षकांना यंदा उन्हाळा सुट्ट्या मिळणार नाहीत. अंतिम सत्राच्या परीक्षा संपताच शिक्षकांचे प्रशिक्षण होऊन १६ मेपासून त्यांना गावागावातील घरांची गणना करुन त्याच्या याद्या तयार कराव्या लागणार आहेत.
Teacher Recruitment

Teacher Recruitment

esakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील शाळांना दरवर्षीप्रमाणे यंदाही २ मेपासून १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्ट्या असणार आहेत. परंतु, यावर्षी जनगणनेच्या कामकाजाला सुरवात होणार असल्याने शिक्षकांना यंदा उन्हाळा सुट्ट्या मिळणार नाहीत. अंतिम सत्राच्या परीक्षा संपताच शिक्षकांचे प्रशिक्षण होऊन १६ मेपासून त्यांना गावागावातील घरांची गणना करुन त्याच्या याद्या तयार कराव्या लागणार आहेत. त्यामुळे उन्हाळा सुट्टी लागली तरीदेखील शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश देण्यात आल्या आहेत.

परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंंह चव्हाण, पुण्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी जनगणना काळात शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश काढले आहेत. सर्व अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांसाठी हे आदेश लागू असणार आहेत. १६ मे ते १४ जूनपर्यंत जनगणनेअंतर्गत घरयादी व घरांची गणना करायची आहे.

तत्पूर्वी, सर्वांचे प्रशिक्षण होणार आहे. त्यामुळे कोणालाही सुट्टीच्या काळात मुख्यालय (ज्या ठिकाणी नोकरी करता ती जागा किंवा गाव-शहर) सोडता येणार नाही. २०२७ वर्षातील जनगणनेचा पहिला टप्पा २७ एप्रिलपासून सुरु होत आहे. दरम्यान, शाळा सुरु झाल्यानंतर २० ते २५ दिवसांत म्हणजेच जुलै महिन्यात ‘टीईटी’ होणार आहे. त्यामुळे शिक्षकांना जनगणनेच्या कामासोबतच ‘टीईटी’चा देखील अभ्यास करावा लागणार आहे.

शासनाच्या मान्यतेने मिळतात विशेष रजा

२०११ नंतर आता जनगणना होणार असून पहिल्यांदा नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर घरगणना होणार असून जिल्हा प्रशासनाने त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाच्या याद्या घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उन्हाळा सुट्टीतही शिक्षकांनी मुख्यालय सोडायचे नाही. जनगणेनेचे काम करणाऱ्या शिक्षकांना पुढे तेवढ्याच शासनाच्या मान्यतेने दिवसाच्या विशेष रजा मिळतात.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

विशेष रजा तेवढ्याच दिवसाच्या

जनगणनेअंतर्गत १६ मे ते १४ जून या काळात पहिल्यांदा घरे मोजायची आहेत. फेब्रुवारी २०२७ पासून लोकसंख्येची तर १ मार्च २०२७ पासून जातनिहाय जनगणना होणार आहे. तत्पूर्वी, नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानुसार २७ एप्रिल ते ८ मे या काळात प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. शाळांना २ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्टी असणार आहेत. पण, उन्हाळा सुट्टीत १६ मे ते १४ जूनपर्यंत सर्वांना घरगणनेचे काम करावे लागणार आहे. त्या शिक्षकांना पुढे तेवढ्याच दिवसाची विशेष रजा घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com