ग्लोबल टेंडरवर लस कंपन्यांचा प्रतिसाद नाही; टोपेंनी सांगितलं कारण

राज्याला सध्या पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाहीएत
Covid Vaccination
Covid Vaccination esakal
Updated on

मुंबई : देशभरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यालाही पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाहीत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं जगातील इतर कंपन्यांकडून लस उपलब्ध व्हाव्यात यासाठी ग्लोबल टेंडरही काढलं आहे. मात्र, यानंतर एकाही कंपनीनं अद्याप प्रतिसाद दिलेला नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासाठी केंद्र सरकारचं धोरणं कारणीभूत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. (No vaccine company has responded On Maharashtra gov global tender Tope said reason)

Covid Vaccination
म्युकरमायकोसिसची इंजेक्शन्स केंद्रानं त्वरीत उपलब्ध करावीत - टोपे

पत्रकार परिषदेत बोलताना राजेश टोपे म्हणाले, "राज्यात सध्या कोरोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा आहे. त्यामुळे सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना आपण लशीकरणाला प्राधान्य दिलं असून या वयोगटातील नागरिक सध्या पहिला डोस घेऊ शकतात. दरम्यान, लस मिळवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. देशातील कंपन्या सध्या आवश्यक प्रमाणात लस पुरवठा करु शकत नाहीत. त्यामुळे आपण ५ कोटी डोसचं सध्या ग्लोबल टेंडर काढलं असून २५ तारखेपर्यंत हे ग्लोबल टेंडर ओपन ठेवण्यात आलं आहे. पण अद्याप कुठल्याही कंपनीचा याला प्रतिसाद मिळालेला नाही. कारण या कंपन्यांना लस पुरवण्यासाठी आधी केंद्र सरकारच्या मंजुरीची गरज असते, त्याअनुषंगानेच या कंपन्या विचार करत असाव्यात"

राज्याला जगातील 'या' लस करायच्यात खरेदी

राज्यात लशीकरण मोहिम तर आपल्याला सुरुच ठेवायची आहे. त्यासाठी देशातील कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन या लशींसह जगातील फायजर, स्पुटनिक, मॉडर्ना याकंपन्यांच्या लशी देखील आपल्याला खरेदी करायच्या आहेत. पण अद्याप कुठल्याही कंपन्यांकडून याला प्रतिसाद आलेला नाही, असं टोपे यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com